Join us  

नववीत नापास झाल्यावर घेतला क्रिकेटचा ध्यास, हार्दिक पंड्याचा झंझावाती प्रवास

भारतीय क्रिकेट संघातीस अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा आज वाढदिवस... 11 ऑक्टोबर 1993 साली गुजरातच्या सुरत येथे त्याचा जन्म झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:38 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातीस अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा आज वाढदिवस... 11 ऑक्टोबर 1993 साली गुजरातच्या सुरत येथे त्याचा जन्म झाला. सध्या दुखापतीमुळे त्याला भारतीय संघाबाहेर बसावे लागले आहे.  वाढदिवसा निमित्ताने त्याच्या बाबतीत काही रंजक गोष्टी आपण जाणून घेऊया.आर्थिक संकटात होते हार्दिकचे कुटूंबहार्दिक पांड्या आज क्रिकेट जगतातील स्टार आहे, परंतु एक काळ असा होता जेव्हा त्याला आर्थिक परिस्थितीशी झगडावे लागले होते. त्याचे वडील फायनान्सचे काम करायचे, परंतु त्यातून त्यांना घर चालवण्यापुरतेही पैसे मिळायचे नाही. 2010 मध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली आणि त्यानंतर पांड्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती आणखी ढासळली.नववीनंतर क्रिकेटवर केले लक्ष्य केंद्रीतहार्दिक नववीत नापास झाला होता. त्यानंतर त्याने शिक्षण बंद केले आणि क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित केले. हार्दिक आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या यांच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी संपूर्ण कुटूंब सुरतहून बडोद्याला शिफ्ट झाले. किरण मोरे यांनी दिले मोफत प्रशिक्षणबडोद्यात आल्यानंतर हार्दिक व कृणाल यांनी भारताचे माजी यष्टिरक्षक किरण मोरे यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. मात्र, त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. किरण मोरे यांनी पहिली तीन वर्ष दोन्ही भावांकडून फी घेतली नाही. हार्दिक लेग स्पिन गोलंदाजी करायचा, परंतु मोरे यांच्या सल्ल्यानंतर तो जलदगती गोलंदाज बनला.इरफान पठाणने दिली बॅटहार्दिकचे कुटुंबिय इतके गरीब होते की त्यांच्याकडे हार्दिकसाठी बॅट घेण्यासाठीचेही पैसे नव्हते. 2014 च्या विजय हजारे चषक स्पर्धेत हार्दिकने फलंदाजीसाठी इरफान पठाणकडे बॅट मागितली होती. इरफाननेही त्याला मदत केली. मुंबईत आल्यानंतर लाईफ चेंजइंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघात निवड झाल्यानंतर हार्दिकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक जॉन राईट्स यांनी लिस्ट A क्रिकेट दरम्यान हार्दिकचा खेळ पाहिला आणि त्याला ट्रायलला बोलवले. त्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या चमूत दाखल करून घेतले. 

टॅग्स :हार्दिक पांड्या