Join us  

महेंद्रसिंग धोनीचे संघात असणे किती महत्त्वाचे, सांगतोय रोहित शर्मा

IND vs WI : भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला 3-0 असे पराभूत केले. या संपूर्ण मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:30 PM

Open in App
ठळक मुद्देकर्णधार विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांतीरोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा मालिका विजयधोनीचे संघात असणे युवा खेळाडूंसाठी फायद्याचे

चेन्नई : भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला 3-0 असे पराभूत केले. या संपूर्ण मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, विंडीजला या संधीचं सोनं करता आले नाही. आगामी ऑस्ट्रेलिया मालिका डोळ्यासमोर ठेवून कोहलीला विश्रांती देण्यात आली, तर धोनीला आश्चर्यकारकरित्या अंतिम अकरातून वगळण्यात आले. मालिका विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने धोनीचे संघात असणे किती महत्त्वाचे आहे, यावर भाष्य केले.

ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर रोहित म्हणाला,''क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये धोनीचे संघासोबत नसणे हा चिंतेचा विषय आहे. निदाहास चषक स्पर्धेतही तो संघासोबत नव्हता. त्याची उणीव आम्हाला जाणवली. धोनी सोबत असला की एक वेगळीच ऊर्जा मिळते. केवळ मलाच नाही, तर संघातील युवा खेळाडूंचा उत्साह वाढतो.''

2006 मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत भारताने 103 सामने खेळले आहेत. त्यापैकी 93 सामन्यांत धोनी संघासोबत होता.  त्याने 2007चा ट्वेंटी-20 विश्वचषकही भारताला जिंकून दिला आहे. त्याने 37.17च्या सरासरीने 1487 धावा केल्या आहेत. धोनीने ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये 54 झेल टिपले आहेत, तर 33 स्टम्पिंग केले आहेत. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीरोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिज