Join us  

IPL 2021 : भारतात कोरोना संकट, तरीही फ्रँचायझी व BCCI आयपीएलवर एवढा खर्च कसं करू शकतं?; RRच्या खेळाडूचा घरचा आहेर

देशात कोरोना संकट वाढत असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचं सुरळीत आयोजन होत आहे. पण, भारतातील बिकट होणारी परिस्थिती पाहून आतापर्यंत पाच खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 5:35 PM

Open in App

देशात कोरोना संकट वाढत असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचं सुरळीत आयोजन होत आहे. पण, भारतातील बिकट होणारी परिस्थिती पाहून आतापर्यंत पाच खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. RCBचा अॅडम झम्पा व केन रिचर्डसन यांनी माघार घेतली, तर राजस्थान रॉयल्सच्या लायम लिव्हिंगस्टोन व अँड्य्रू टाय यांनीही बायो बललला कंटाळून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आर अश्विन याच्या कुटुंबीयांना कोरोना झाल्यानं त्यानंही आयपीएलमधून माघार घेतली आहे. देशात दररोज जवळपास ३ लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. Pat Cummins चे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; ऑक्सिजन खरेदीसाठी PM Cares Fund ला दिले ३० लाख!

ऑस्ट्रेलिया व राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज अँड्य्रू टाय ( Andrew Tye) हा आयपीएल २०२१च्या मध्यातून माघार घेणारा पहिला खेळाडू आहे. वैयक्तिक कारणामुळे त्यानं ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती, परंतु यंदा देशातील सहा वेगवेगळ्या शहरांमध्ये आयपीएल सामने खेळवले जात आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाही आयपीएल खेळवणे सुरक्षित आहे का, असा सवाल आता टायनं केला आहे.भारतीय क्रिकेट संघाला मिळालं २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचं तिकिट; रंगणार India vs Pakistan चा थरार

सरकार, बीसीसीआय आणि फ्रँचायझींचं या काळात आयपीएलवर एवढा खर्च करणे योग्य आहे का, असाही सवाल त्यानं केला. तो म्हणाला,''खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केल्या, आता आम्ही सुरक्षित आहोत, परंतु पुढेही सुरक्षित असू का? पण, भारतीयांच्या नजरेनं विचार केल्यास या काळात फ्रँचायझी, बीसीसीआय आणि सरकार प्रचंड पैसा खर्च करत आहेत, दुसरीकडे येथील लोकांना पैसे नसल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जात नाही.''  Abhinav Bindra : बबलमध्ये राहून क्रिकेटपटू आंधळ्या-बहिऱ्यांसारखे वागू शकत नाही; अभिनव बिंद्रानं IPLवर साधला निशाणा

त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीत क्रिकेटमुळे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत असल्याचेही ऑसी गोलंदाजानं मान्य केलं.'' खेळ सुरू राहत असले आणि त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलत असेल, त्यांचं टेंशन हलकं होत असेल, तर तो सुरू ठेवण्यास काहीच हरकत नाही. पण, असे प्रत्येकालाच वाटत नसावे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या विचारांचा आदर केला गेला पाहिजे,''असेही तो म्हणाला.  

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सकोरोना वायरस बातम्या