कराची : देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून लवकरच ग्रीन सिग्नल मिळेल, अशी पाकिस्तानला आशा आहे. पाकमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आयसीसीने आंतरराष्टÑीय सुरक्षा कंपनीची मदत घेतली आहे. ब्रिटन, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात आदी देशात काम करणाºया या कंपनीवर आयसीसीने पाकिस्तानातील सुरक्षेचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. (वृत्तसंस्था)
याच महिन्यात कंपनीचे अधिकारी तसेच फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल प्लेयर्स असोसिएशनचे प्रतिनिधी (फिका)
पाकचा दौरा करणार आहेत.
पीसीबी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, ‘सुरक्षा कंपनीच्या अहवालानंतरच विश्व एकादशचा लाहोर दौरा आणि टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या पाक दौºयाचे भवितव्य ठरणार आहे. पाकिस्तानात आंतरराष्टÑीय सामन्यांच्या आयोजनासाठी आयसीसी आमच्या मदतीस तयार आहे. सुरक्षेचा आढावा घेणारी कंपनी प्रतिष्ठित आहे. आमच्या सुरक्षा उपायांवर कंपनी समाधानी असेल, अशी अपेक्षा आहे.(वृत्तसंस्था)