नवी दिल्ली : शुभमन गिल आणि रोहित शर्मा ! दोघे एकदिवसीय संघाचे आजी-माजी कर्णधार. भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला. या दौऱ्यात रोहित हा गिलच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याआधी, दिल्ली विमानतळावर दोघे एकत्र आले. बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसले.
गिलने रोहितच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावर रोहित हसत म्हणाला, ‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’ विमानतळावर विराट कोहली आणि रोहित यांच्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. नंतर गिल कोहलीला भेटला. विराट नवनियुक्त उपकर्णधार श्रेयस अय्यरसह बसलेला होता. विराटने गिलचा हात हसत हातात घेतला आणि त्याच्या पाठीवर प्रेमाने थाप दिली. गिलनंतर श्रेयस सोबतही गप्पा मारताना दिसला.