Join us  

IPL 2020 : चेन्नई, राजस्थान यांना आता एक 'चूक' पडणार महागात; Play Offच्या आशा अजूनही जीवंत

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे स्थान निश्चित मानले जात आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 4:01 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांना शनिवारी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे त्यांचे Play Offच्या आशा मावळतीच्या दिशेनं झुकू लागल्या आहेत. पण, अजूनही त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येणार आहे. मात्र, त्यांना पुढील प्रत्येक पाऊल जपून टाकावा लागेल आणि एक चूक त्यांना महागात पडणार आहे. CSK आणि RR यांना ९ सामन्यांत ३ विजय मिळवता आले आहेत आणि त्यांना ६ पराभव पत्करावे लागले आहेत. त्यांच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण आहेत.

शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला ( CSK) दिल्ली कॅपिटल्सकडून ( Delhi Capitals) पराभव पत्करावा लागला. फॅफ ड्यू प्लेसिस ( ५८), अंबाती रायुडू ( ४५), शेन वॉटसन ( ३६) आणि रवींद्र जडेजा ( ३३*) यांनी चेन्नईला ४ बाद १७९ धावा करून दिल्या. प्रत्युत्तरात दिल्लीनं ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. शिखर धवन ५८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०१ धावांवर नाबाद राहिला, तर अक्षर पटेलनं ५ चेंडूंत ३ षटकार खेचून २१ धावा केल्या. 

दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या ६ बाद १७७ धावांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं यशस्वी पाठलाग केला. रॉबीन उथप्पा ( ४१) आणि स्टीव्ह स्मिथ ( ५७) यांनी उत्तम खेळी केली. प्रत्युत्तरात RCBकडून एबी डिव्हिलियर्सचं वादळ घोंगावलं. १२ चेंडूंत विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता असताना एबीनं १९व्या षटकात २५ धावा चोपून सामना RCBच्या बाजूनं झुकवला. त्यामुळे अखेरच्या षटकात RCBला विजयासाठी १० धावा हव्या होत्या आणि एबीनं त्या सहज करून दिल्या. RCBनं हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. एबीनं २२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ५५ धावा केल्या. गुरकिरत सिंग मनने नाबाद १९ धावा करून त्याला योग्य साथ दिली. 

Point Tableची परिस्थिती

  1. दिल्ली कॅपिटल्स - ९ सामने, ७ विजय, २ पराभव, १४ गुण
  2. मुंबई इंडियन्स - ८ सामने, ६ विजय, २ पराभव, १२ गुण
  3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ९ सामने, ६ विजय, ३ पराभव, १२ गुण
  4. कोलकाता नाईट रायडर्स - ८ सामने, ४ विजय, ४ पराभव, ८ गुण
  5. सनरायझर्स हैदराबाद - ८ सामने, ३ विजय, ५ पराभव, ६ गुण
  6. चेन्नई सुपर किंग्स - ९ सामने, ३ विजय, ६ पराभव, ६ गुण
  7. राजस्थान रॉयल्स - ९ सामने, ३ विजय, ६ पराभव, ६ गुण
  8. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ सामने, २ विजय, ६ पराभव, ४ गुण

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या वाट्यातील पाच सामने अजूनही शिल्लक आहेत. या दोघांनाही Play Offमध्ये प्रवेश करण्यासाठी पाचही सामने जिंकावे लागतील. तर त्यांना १० गुणांची कमाई करता येईल आणि आधीच्या ६ गुणांसह एकूण १६ गुणांची कमाई करून ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतील. पण, यापैकी केवळ एकच संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित करू शकतो. त्यामुळे चेन्नई - राजस्थान यांच्या सामन्यावर दोघांचेही भवितव्य अवलंबून आहे. 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स