बंगळुरू : श्रीकर भरतचे शतक आणि कुलदीप यादवची अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या औपचारीक कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघावर मजबूत पकड निर्माण केली. भरतने १८६ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०६ धावांची खेळी केली. कुलदीप यादवने त्याला उत्कृष्ट साथ दिली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने आॅस्ट्रेलियाच्या ३४६ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात ५०५ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा आॅस्ट्रेलियाने दुसºया डावात २ बाद ३८ धावा केल्या होत्या. आॅसी अजून १२१ धावांनी पिछाडीवर आहे.