Join us  

सुरेश रैनाच्या चेन्नई सुपर किंग्समधील भवितव्याबाबत ठरलं; फ्रँचायझीचे स्पष्ट संकेत

सुरेश रैना नुकताच एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला होता. मुंबईती विमानतळाशेजारील एका पबमध्ये पार्टी करताना मुंबई पोलिसांनी त्याच्यासह ३४ सेलिब्रेटिंना अटक केली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 24, 2020 11:04 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघासोबत बऱ्याच नाट्यमय घटना घडल्या. संयुक्त अरब अमिरातीत ( UAE) दाखल झाल्यापासून CSKसमोर एकामागून एक संकट आले. दीपक चहर व ऋतुराज गायकवाड यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले, त्यानंतर सुरेश रैना ( Suresh Raina) आणि हरभजन सिंग ( Harbhajan Singh) या दोन खेळाडूंनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. रैनाच्या माघार घेण्यामागे कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्यासोबतचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा रंगली. त्यात CSKनं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून रैनाचे नावच काढून टाकल्यानंतर चर्चा अधिक तीव्र झाल्या. त्यामुळे रैनाची CSKमधील इनिंग संपली अशी चर्चा असताना फ्रँचायझींनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

सुरेश रैना नुकताच एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला होता. मुंबईती विमानतळाशेजारील एका पबमध्ये पार्टी करताना मुंबई पोलिसांनी त्याच्यासह ३४ सेलिब्रेटिंना अटक केली. कोरोना नियमांचे उल्लंघन करून ही पार्टी सुरू असल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर रैनाची सुटकाही झाली. या घटनेनंतर सुरेश रैनाच्या व्यवस्थापकीय टीमनं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यात त्यांनी म्हटलं की,''सुरेश रैना मुंबईत एका शूटसाठी गेला होता आणि ती संपण्यास विलंब झाला. त्यानंतर एका मित्रानं रैनाला डिनरसाठी निमंत्रण दिले आणि तेथूनच तो दिल्लीचं विमान पकडण्यासाठी जाणार होता. त्याला मुंबईतील वेळेबाबतच्या नियमांची माहिती नव्हती. याबाबत पोलिसांनी माहिती देताच, रैनानं त्वरित आपली चूक मान्य केली. ही चूक जाणीवपूर्वक केली नाही. तो नेहमी नियमांचे पालन करतो. भविष्यातही तो नियमांचे पालन करत राहणार.'' 

२०२० हे वर्ष सुरेश रैनासाठी फार चांगले गेले नाही. त्यानं १५ ऑगस्टला महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यात त्याच्या काकांवर दरेडोखोरांनी भ्याड हल्ला केला आणि त्यात काकांना प्राण गमवावे लागले. आत्याही त्यात गंभीर जखमी झाली आहे. पण, वर्षाअखेरीस रैनाला CSKकडून एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रँचायझींनी रैनाला इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात संघात पाहयला आवडेल, असे संकेत दिले. मुंबई मिररशी बोतलाना CSKच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यानं संगितले की, ''पुढील मोसमात तो आमच्यासोबत असेल. त्याला संघापासून दूर करण्याचा कोणताही प्लान नाही.''

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला १० जानेवारीपासून सुरूवात होत आहे आणि रैना त्यात उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल.  

टॅग्स :सुरेश रैनाआयपीएलIPL 2020चेन्नई सुपर किंग्स