Join us  

... अन् अखेर १०४ सामने खेळल्यावर त्याला मिळाले कर्णधारपद

काही व्यक्तींना १-२ सामने खेळल्यावरही कर्णधारपद मिळतं, पण एका खेळाडूला तब्बल १०४ सामने खेळल्यावर संघाचे कर्णधारपद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 5:46 PM

Open in App

मुंबई : आपल्या देशाकडून खेळायला मिळावं, देशाचं नाव मोठं करावं, अशी सर्व खेळाडूंचीच इच्छा असते. देशाचे नेतृत्व करायला मिळालं तर सोन्याहून पिवळं. काही व्यक्तींना १-२ सामने खेळल्यावरही कर्णधारपद मिळतं, पण एका खेळाडूला तब्बल १०४ सामने खेळल्यावर संघाचे कर्णधारपद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात ठेवून ही निवड करण्यात आली असावी. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे.

आयर्लंडच्या ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदी अँड्र्यू बालबिर्नीची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याचा फॉर्म आणि फिटनेसही उत्तम आहे. त्यामुळे त्याची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

याबाबत संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम फोर्ड म्हणाले की, " आम्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची पात्रता पार करण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे आतापासूनच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचा विचार आम्ही करायाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रथम आम्ही कर्णधार निवडला आहे. " 

टॅग्स :आयर्लंडटी-२० क्रिकेट