Join us  

'त्याच्या'मुळे मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करतेय; स्मृती मानधनानं IPL 2020मधील निवडला तिचा फेव्हरिट खेळाडू

राजस्थान रॉयल्सची ( RR) सध्याची कामगिरी पाहता त्यांनी आतापर्यंत टॉप फोरमध्ये स्थान कायम राखले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 01, 2020 5:33 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात आतापर्यंत प्रत्येक संघानं प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. या 10-11 दिवसांत अनेक रोमहर्षक सामने पाहायला मिळाले, दोन सामने तर सुपर ओव्हरमध्ये खेळले गेले. अनुभवी व स्टार खेळाडूंपेक्षा आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हीनंही या युवा खेळाडूंपैकी एक फेव्हरिट खेळाडू निवडला आहे आणि त्याच्यासाठीच ती आता राजस्थान रॉयल्स संघाला ( Rajasthan Royals) सपोर्ट करत आहे.  

राजस्थान रॉयल्सची ( RR) सध्याची कामगिरी पाहता त्यांनी आतापर्यंत टॉप फोरमध्ये स्थान कायम राखले आहे. तीन सामन्यांपैकी दोनमध्ये त्यांनी दोनशे + धावा चोपल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) बुधवारी त्यांची विजयी घोडदौड अडवली. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली RR संघ सर्व आघाडींवर खरा उतरला आहे. त्यात जोफ्रा आर्चरचा भेदक मारा, संजू सॅमसनचं सातत्य आणि राहुल टेवाटिया याची अविस्मरणीय खेळी. यांनी RRचे चाहते सुखावले आहेत. 

स्मृतीनं India Today शी बोलताना सांगितले की ती संजू सॅमसनची फॅन बनली आहे. त्याची आतषबाजी पाहून या मोसमात RRची समर्थक बनण्याचा निर्णय तिनं घेतला आहे. ''युवा खेळाडूला फलंदाजी करताना पाहून प्रेरणा मिळते. संजू सॅमसन ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, ते पाहून मी त्याची फॅन बनली आहे. त्याच्यामुळेच मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करायला सुरुवात केली. त्याची फलंदाजी नेक्स्ट लेव्हलची आहे. IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्याकडून काहीतरी शिकायचं, हा विचार मी करत आहे.''

अन्य खेळाडूंविषयी बोलताना स्मृतीनं विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा खेळ पाहायला आवडतो, असे सांगितले. ''मी सर्व सामने पाहते. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांना मी सपोर्ट करते,''असेही ती म्हणाली.

Women IPLसाठी स्मृती UAEत दाखल होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत या लीगच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, पंरुत 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणे अपेक्षित आहे.  

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्स