Hathras Gangrape : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा विराट कोहलीकडून तीव्र शब्दात निषेध, म्हणाला...

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय मुलीने उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

By स्वदेश घाणेकर | Updated: September 29, 2020 18:46 IST2020-09-29T18:45:46+5:302020-09-29T18:46:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hathras Gangrape : What happened in Hathras is inhumane and goes beyond cruelty, Virat Kohli Tweeted  | Hathras Gangrape : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा विराट कोहलीकडून तीव्र शब्दात निषेध, म्हणाला...

Hathras Gangrape : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा विराट कोहलीकडून तीव्र शब्दात निषेध, म्हणाला...

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे सामूहिक बलात्कार ( Hathras Gangrape) झालेल्या १९ वर्षीय मुलीने उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती वृत्तसंस्थेच्या एएनआयने दिली आहे. या मुलीवर १४ सप्टेंबर रोजी तिच्या शेतात चार माणसांनी शेतावर जाताना तिच्यावर बलात्कार केला होता. दुसर्‍या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्, प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानेही याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काळ्या दिवशी ही मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. नंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. हाथरस येथील प्रभारी कोतवाली यांनी त्यांना पोलिस लाइनमध्ये पाठविले. प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेबुलरी (पीएसी) महिलेच्या घरी तैनात होते. बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्षा मायावती यांनी या घटनेचा निषेध केला होता. उत्तर प्रदेशात कोणत्याही समाजातील कोणतीही महिला सुरक्षित नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्याकडे लक्ष देण्यास सांगितले.

विराटनं ट्विट केलं की,''हाथरस येथे जे घडले, ते अमानवी आणि क्रूर कृत्या पलिकडचं आहे. हे भयंकर कृत्य करणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी आशा व्यक्त करतो. #JusticeForManishaValmiki''

Web Title: Hathras Gangrape : What happened in Hathras is inhumane and goes beyond cruelty, Virat Kohli Tweeted