Join us  

हसीन जहॉँ पोहचली सासरी, पण...

भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीनजहॉँ ही आपली मुलगी आयरा तसेच वकिलासह रविवारी पोलीस सुरक्षेत सासरी पोहचली; मात्र तिथे गेल्यानंतर तिची निराशा झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:05 AM

Open in App

अमरोहा : भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीनजहॉँ ही आपली मुलगी आयरा तसेच वकिलासह रविवारी पोलीस सुरक्षेत सासरी पोहचली; मात्र तिथे गेल्यानंतर तिची निराशा झाली. उत्तर प्रदेशातील अमरोह येथील मोहम्मद शमीच्या घराला कुलूप होते. घरात कुणीही नसल्यामुळे तिला हताश होतच माघारी परतावे लागले. तिने घराचे कुलूप तोडण्यास सांगितले; मात्र पोलिसांनी त्यास नकार दिला. घरात कुणीही नसताना आम्ही असे करू शकत नाही, असे सांगताच हसीनजहॉँची निराशा झाली.पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली की मला आता येथेच राहायचे आहे. मला कितीही त्रास झाला तरी चालेल; मात्र आमच्यातील नाते मी तुटू देणार नाही. मला माझ्या अधिकारापासून दूर केले जाऊ शकत नाही. मी येथे येणार अशी माहिती मिळताच शमीच्या नातेवाइकांनी घराला कुलूप लावले, असा आरोप तिने केला. मी पुराव्यासह माझ्या पतीच्या विरोधात माध्यमांना सांगितले आहे, याची जाणीव माध्यमांनाही असावी. यामागे एक पत्नी आणि एका महिलेचे दु:ख आहे. याकडे केवळ आरोप-प्रत्यारोप या नजरेतून पाहता कामा नये, असेही ती म्हणाली. दुसरीकडे, शमीचे काका मोहम्मद जमीर म्हणाले, की हसीनजहॉँ कोणतीही माहिती न देताच घरी आली. असे असतानाही आम्ही तिचे स्वागत करतो.आश्चर्र्य म्हणजे, मोेहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीनजहॉँ यांच्यातील वाद मार्चच्या पहिल्या आठवड्यात सर्वांसमोर आले होते. हसीनजहॉँने शमीवर इतर महिलांसोबत अवैध संबंध ठेवणे, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते.शमीचे पाकिस्तानातील एका महिलेसोबत संबंध असल्याचा दावा देखील हसीनने केला होता. त्यासोबतच त्याच्याविरोधात कोलकाता पोलिसात तक्रारही नोंदवली होती. आयपीएलच्या या सत्राच्या दरम्यानच त्याची कोलकाता पोलिसांनी चौकशी केली होती.

टॅग्स :मोहम्मद शामीपरिवार