Join us  

"हाशिम अमलाने हिंदूंना मुस्लीम बनवलं"; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा

हाशिम अमलासोबतच आणखी एक मुस्लीम खेळाडूचेही घेतलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 5:43 PM

Open in App

Saeed Anwar Hashim Amla: पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सईद अन्वरने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमलाबाबत मोठा खुलासा केला. हाशिमने हिंदूंना मुस्लिम बनवल्याचा दावा सईद अन्वरने केला आहे. पाकिस्तानच्या सईद अन्वरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तो कोणत्या तरी घटनेचा उल्लेख करत आहे. या व्हिडिओमध्ये तो अमलाच्या खेळाचे कौतुक करताना दिसतो. पण अमलाचे कौतुक करत असताना त्यांनी केलेल्या दाव्यावरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे.

नक्की काय म्हणाला सईद अन्वर?

"विश्वचषकात अनेक लोक इस्लाम धर्म स्वीकारत आहेत. अल्लाहने विश्वचषक हे माध्यम बनवले आहे. हाशिम आमला हा महान क्रिकेटपटू आहे. त्याने अनेकांना कलमा शिकवला आहे. एक हिंदू कुटुंब पूर्णपणे मुस्लिम झाले. मोहम्मद युसूफ देखील अनेक लोकांसाठी माध्यम झाला. सईद अन्वरच्या या विधानावर सध्या तो खूप ट्रोल होत आहे. @pakistan_untold या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रत्येक पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू मुस्लिमेतर समाजातील काहींना धर्मांतर करून मुस्लीम करण्याच्या प्रयत्नात होता, असेच सईद अन्वरच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

हाशिम आमलाबद्दल बोलायचे झाले तर त्याची मुळे भारताशी जोडलेली आहेत. 1927 मध्ये त्यांचे आजोबा सुरतहून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. अमलाने 2004 ते 2019 दरम्यान 124 कसोटी, 181 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर 9 हजार 282 कसोटी धावा, 8113 एकदिवसीय धावा आणि 1277 टी-20 धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000, 3000, 4000, 5000, 6000 आणि 7000 धावा करण्याचा विक्रम अमलाच्या नावावर आहे. 10 एकदिवसीय शतके झळकावणारा तो सर्वात वेगवान क्रिकेटपटू देखील आहे. जून 2014 ते जानेवारी 2016 दरम्यान त्याने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचे नेतृत्वही केले.

आयपीएलमध्ये 2 शतके

हाशिम आमला आयपीएलमध्येही खेळला आहे. 2017 मध्ये, त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब आणि नंतर पंजाब किंग्ससाठी २ शतके झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवल्यानंतर, 8 ऑगस्ट 2019 रोजी, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

टॅग्स :हाशिम आमलापाकिस्तानहिंदूमुस्लीम
Open in App