Join us  

मुलीची इन्शुरन्स पॉलिसी काढायची सांगत हसीनने दहा लाखांना गंडवले ; मोहम्मद शामीचा आरोप

शनिवारी शामीने जे आरोप हसीनवर केले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा हसीनच्या चारीत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 5:10 PM

Open in App
ठळक मुद्देएके दिवशी मला मुलीचे इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्र सापडली आणि मला त्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही, असे शामी म्हणाला.

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्या प्रकरणाला रोज वेगळी कलाटणी मिळताना आपण पाहत आहोत. शनिवारी शामीने जे आरोप हसीनवर केले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा हसीनच्या चारीत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शामीने याबद्दल सांगितले की, '' एके दिवशी हसीन माझ्याकडे आली आणि तिने आपल्या मुलीची इन्शुरन्स पॉलिसी काढायची आहे. मलाही तिचा निर्णय त्यावेळी योग्य वाटला होता. त्यानंतर तिने माझ्याकडे इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी पंधरा लाख रुपये मागितले. त्यावेळी माझ्याकडे पैसे होते आणि तिला काही दिवसांत मी ते पैसे दिलेही. पण पैसे मिळाल्यावर हसीन असे काही करेल, यावर माझा विश्वास बसत नव्हता.''

हसीनने केलेल्या फसवणूकीबाबत शामी म्हणाला की, '' हसीनने माझ्याकडे इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी पंधरा लाख रुपये मागितले. मला वाटले की, हसीनने मुलीची पंधरा लाखांची इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल. काही दिवस मीदेखील या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. कारण माझा हसीनवर विश्वास होता. एके दिवशी मला मुलीचे इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्र सापडली आणि मला त्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. त्यावेळी मुलीची इन्शुरन्स पॉलिसी दहा लाखाचीच असल्याचे मला समजले. माझ्याकडून पंधरा लाख मागून हसीनने फक्त पाच लाखांची पॉलिसी काढत दहा लाख रुपये लांबवले होते.'' 

एक आई आपल्या मुलीच्या इन्शुरन्ससाठी दिलेले पैसे लांबवत असेल, तर त्याला का म्हणावे, अशी प्रतिक्रीया उमटत आहे.

टॅग्स :मोहम्मद शामी