Harsha Bhogle : चायनिज व्हायरसची इंग्लंड क्रिकेट संघात घुसखोरी; हर्षा भोगलेच्या ट्विटची चर्चा

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या वन डे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होण्यापूर्वी मोठा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 03:22 PM2021-07-06T15:22:28+5:302021-07-06T15:22:53+5:30

whatsapp join usJoin us
Harsha Bhogle Calls COVID-19 A 'Chinese Virus' And The Internet Is In Roaring Appreciation | Harsha Bhogle : चायनिज व्हायरसची इंग्लंड क्रिकेट संघात घुसखोरी; हर्षा भोगलेच्या ट्विटची चर्चा

Harsha Bhogle : चायनिज व्हायरसची इंग्लंड क्रिकेट संघात घुसखोरी; हर्षा भोगलेच्या ट्विटची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या वन डे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होण्यापूर्वी मोठा धक्का बसला. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंडच्या वन डे संघातील ३ खेळाडू व व्यवस्थापकीय टीममधील ४ असे सात सदस्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे संपूर्ण संघालाच विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. आता इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड या मालिकेसाठी आजच दुसऱ्या संघाची घोषणा करणार आहे. इंग्लंडच्या संघातील ही बातमी येऊन धडकल्यानंतर भारताचे समालोचक हर्षा भोगले ( Harsha Bhogle) यांनी केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे. 

''हा व्हायरस कुठे जाईल असं वाटत नाही. या चायनीज व्हायरसनं आता इंग्लंडच्या क्रिकेट संघात घुसखोरी केली आहे. बायो बबल अजून सुरक्षित करायला हवं. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.  दक्षिण आफ्रिकन प्रकार, ब्राझिलीयन प्रकार आणि भारतीय प्रकार असे सर्रास बोलले जाते. मग, जिथे या व्हायरसचा जन्म झालाय, त्याच्याबाबतीतही हाच नियम लागू व्हायला हवा,''असे सडेतोड मत हर्षा भोगले यांनी व्यक्त केले. 

नेटिझन्सला आवडला स्पष्टवक्तेपणा...






Web Title: Harsha Bhogle Calls COVID-19 A 'Chinese Virus' And The Internet Is In Roaring Appreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.