Join us  

रिषभ पंत IPL 2024 साठी सज्ज झाला, पण Delhi Capitalsच्या ४ कोटीच्या फलंदाजाची माघार 

अलीकडे भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघात त्याचा समावेश होता, परंतु त्याने शेवटच्या क्षणी कसोटी संघातून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 3:45 PM

Open in App

IPL 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला काल बीसीसीआयने सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली. रिषभ पंत ( Rishabh Pant) हा आयपीएल २०२४ खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची घोषणा काल बीसीसाआयने केली. रिषभ पंत आता दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यावेळी थोडा उत्साही आणि अस्वस्त वाटत असल्याचे रिषभने कबूल केले. एकिकडे आनंद साजरा होत असताना त्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक ( Harry Brook )  याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२४ मधून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटी रुपयांना त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. 

अलीकडे भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघात त्याचा समावेश होता, परंतु त्याने शेवटच्या क्षणी कसोटी संघातून माघार घेतली. इंग्लंड संघ व्यवस्थापन आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांनी खेळाडू आणि त्याच्या कुटुंबासाठी गोपनीयतेची मागणी केली. "ब्रूकचे कुटुंबीय आदरपूर्वक या काळात गोपनीयतेची विनंती करत आहेत.  ईसीबी आणि कुटुंबाने मीडिया आणि जनतेला विनंती केली की त्यांनी त्यांच्या गोपनीयतेच्या इच्छेचा आदर करावा,"असे ईसीबीने जानेवारीमध्ये सांगितले.

इंग्लिश खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे वचनबद्धतेतून माघार घेण्याच्या या प्रवृत्तीमुळे आयपीएल फ्रँचायझींमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांचे म्हणणे आहे की अशा अनपेक्षित आणि अचानक खेचण्यामुळे त्यांचे लिलाव नियोजन विस्कळीत होते. आयपीएल फ्रँचायझी हा मुद्दा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) हाताळण्याचा विचार करत आहेत.

इंग्लंड संघाच्या सध्याच्या बेन स्टोक्स-ब्रँडन मॅक्युलम यांच्या व्यवस्थापनात ब्रूकने बझबॉल शैलीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र, गेल्या वर्षी आयपीएलमधील त्याची कामगिरी निराशाजनक होती. सन २०२३ च्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने  त्याला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याने २१ पेक्षा कमी सरासरीने केवळ १९० धावा करू शकला. परिणामी, फ्रँचायझीने त्याला लिलावापूर्वी सोडले आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला ४ कोटी रुपयांना विकत घेतले.  

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सइंग्लंड