Join us

हरमनप्रीत अव्वल पाचमध्ये, स्मृती व जेमिमा कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी

आयसीसी महिला टी-२० मानांकन : भारतीय संघ पाचव्या स्थानी; जेमिमाही चमकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 06:41 IST

Open in App

दुबई : भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसीच्या जाहीर झालेल्या महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये फलंदाजात अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे. त्याचवेळी सलामीवीर स्मृती मंधाना व जेमिमा रोड्रिग्ज यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे.

वेस्ट इंडिजमध्ये अलीकडेच संपलेल्या आयसीसी महिला विश्व टी२० स्पर्धेत आॅस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज एलिसा हिलीनंतर सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंत दुसºया स्थानी असलेल्या हरमनप्रीतने तीन क्रमांकाची प्रगती करताना तिसरे स्थान गाठले आहे. या स्पर्धेत भारतीय कर्णधाराने एकूण १८३ धावा केल्या. त्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या १०३ धावांच्या आकर्षक खेळीचा समावेश आहे. युवा फलंदाज जेमिमाने ९ स्थानांची प्रगती करताना सर्वोत्तम सहावे स्थान, तर स्मृतीने सात स्थानांची प्रगती करताना दहावे स्थान पटकावले. हिलीने चार स्थानांची प्रगती करताना आठवे स्थान पटकावले आहे. तिने स्पर्धेत २२५ धावा केल्या. ती विश्व स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली.

गोलंदाजांच्या क्रमवारीत आॅस्ट्रेलियाची मेगान शट पहिल्या आणि भारताची पूनम यादव दुसºया स्थानी कायम आहेत. न्यूझीलंडची फिरकीपटू लीग कास्परेकने सात स्थानांची प्रगती करती तिसरे स्थान गाठले आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन १६ व्या स्थानावरून चौथ्या आणि वेगवान गोलंदाज अन्या श्रेबसोले १२ व्या स्थानावरून सहाव्या स्थानी पोहचली आहे. (वृत्तसंस्था)