Join us  

Womens T20 Cricket 2018: 'अरे, ही तर सुपरमॅन एबीडीची सुपर सिस्टर'; हरमनप्रीतचा झेल बघायलाच हवा! 

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार हरमनप्रीत कौरच्या एका भन्नाट कॅचन क्रिकेटप्रेमींना 'याड' लावलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 11:31 AM

Open in App

मुंबईः आयपीएल-११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ प्ले-ऑफआधीच बाद झाला असला तरी, विराटसेनेचा वीर एबी डिविलियर्सच्या पराक्रमाची आणि खास करून त्या 'सुपरमॅन' स्टाइल कॅचची अजूनही चर्चा होतेय. अशातच, भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार हरमनप्रीत कौरच्या एका भन्नाट कॅचन क्रिकेटप्रेमींना 'याड' लावलंय. तिचा हा कॅच पाहून तिला 'सुपरगर्ल'चीच उपमा दिली जातेय.

सुपरनोवास विरुद्ध ट्रेलब्लेझर्स या दोन संघांमध्ये काल महिला टी-२० चा विशेष सामना वानखेडे स्टेडियमवर झाला. त्यात हरमनप्रीतच्या सुपरनोवास संघाने ३ विकेट्सनी विजय साकारला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्सनं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १२९ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यांचं १३० धावांचं लक्ष्य अगदी शेवटच्या चेंडूवर गाठत सुपरनोवासनं थरारक विजयाची नोंद केली. 

हा सामना बऱ्याच गोष्टींसाठी लक्षात राहणारा असला, तरी हरमनप्रीतच्या कॅचने सगळ्यांचीच वाहवा मिळवली. स्मृती मानधनाचा उंच उडालेला फटका हरमननं हवेत झेपावत टिपला, तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यापुढे एबी डिविलियर्स तरळला. तिच्या या कॅचचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झालाय आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 

बघा, हरमनना 'जबरा' कॅच

 

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेट 2018महिला टी-२० क्रिकेटक्रिकेटसुपरनोवाट्रेलब्लेजर्स