Join us

हरमनप्रीत पंजाब पोलिसात दाखल

भारतीय महिला टी-२० क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही आज पंजाब पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर रुजू झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:48 IST

Open in App

चंडीगढ : भारतीय महिला टी-२० क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही आज पंजाब पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर रुजू झाली आहे.पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलीस महासंचालक सुरेश अरोडा यांनी तिच्या वर्दीवर ‘स्टार’ लावले. अमरिंदर सिंह यांनी टि्वट केले की, युवा क्रिकेटर हरमनप्रीत हिच्या गणवेशावर स्टार लावून अभिमान वाटत आहे. मला विश्वास आहे ती कायमच चांगला खेळ करत राहील. माझ्या शुभेच्छा तिच्या सोबत आहेत’ कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी तिच्या सोबतचा फोटोदेखील टि्वट केला आहे. (वृत्तसंस्था)