Hardik Pandya Spotted Celebrating Diwali With Model Mahieka Sharma : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या हा सध्या फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत आहे. नताशापासून वेगळे झाल्यावर हार्दिक पांड्याचे नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाशी जोडले गेले. IPL दरम्यान ती हार्दिक पांड्यासोबत मुंबई इंडियन्सच्या बसमधून फिरतानाही दिसली. पण UAE च्या मैदानात रंगलेल्या आशिया कप स्पर्धेदरम्यान हार्दिक पांड्याच्या प्रेम कहाणीत नव्या हिरोईनीची एन्ट्री झाली. आता हार्दिक पांड्या नव्या गर्लफ्रेंडसोबत "खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..." हे गाणं म्हणत मिरवताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रेमाच्या खेळातील ३३ चा आकडा; ३२ व्या बर्थडेला हार्दिकनं दिली प्रेमाची कबुली
Hardik Pandya With Mahieka Sharma
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि मॉडेल अशी ओळख असलेल्या माहिका शर्मानं एक सेल्फी शेअर केली. तिच्या हातांच्या बोटावर ३३ क्रमांकाचा आकडा दिसला अन् ती पांड्यासोबत डेट करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं. हार्दिक पांड्यानं ३२ वा वाढदिवस तिच्यासोबत साजरा केल्याचे खास पोस्ट शेअर केली अन् दोघांच्यात सुरु असलेल्या प्रेमकहाणीला दुजोरा मिळाला. नव्या गर्लफ्रेंडसोबतच्या हॉट अँण्ड बोल्ड फोटो शेअर करून हार्दिक पांड्याने माहिकासोबतच्या नात्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिल्याचे पाहायला मिळाले.
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
हार्दिकची 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड'; पारंपारिक लूकसह 'संस्कारी' रुपात दिसली अन्...
दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत लोकप्रिय सेलिब्रिटींचा लूक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. यंदाच्या दिवाळीत हार्दिक पांड्या आणि त्याची दिल्लीवाली गर्लफ्रेंड माहिका शर्मानं आपल्या खास पारंपारिक अंदाजातील लूकसह सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. जोडीचा पारंपारिक अंदाजातील 'रेड लूक' सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हायरल फोटो आणि व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या हा माहिकाला फॉलो करताना दिसत आहे. हार्दिक पांड्यानं गर्लफ्रेंडचे हॉट अँण्ड बोल्ड अवतारातील फोटो शेअर करत माहिकासोबत जोडी जमल्याची पुष्टी केली होती. माहिका ही सोशल मी़डियावर चांगलीच सक्रीय आहे. ती सातत्याने आपले फोटो शेअर करताना दिसते. पण तिच्या या फोटोत बहुतांशवेळा बोल्डनेसचा तडकाच दिसतो. पण पांड्यासोबतच्या परफेक्ट मॅचिंग लूकमध्ये माहिकानं 'संस्कारी' रुप दाखवत क्रिकेटरसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरु करण्यासाठी तयार असल्याची हिंटचं दिल्याचे दिल्याचे दिसते. दिवाळीच्या मुहूर्तावर परफेक्ट मॅचिंगसह दिसलेला प्रेमाचा गोडवा नव्या वर्षात नव्या इनिंगची सुरुवात करणार का? ते पाहण्याजोगे असेल.