Join us  

कॉफी विथ करण प्रकरण; हार्दिक पांड्यानं भरला निम्माच दंड, जाणून घ्या कारण

हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना बीसीसीआयच्या लोकपालांनी शिक्षा सुनावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 2:59 PM

Open in App

मुंबई : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना बीसीसीआयच्या लोकपालांनी शिक्षा सुनावली होती. या दोघांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. त्यापैकी निम्मीच रक्कम हार्दिकने भरली आहे. 

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्यानंतर पांड्या आणि राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. या प्रकरणाची चौकशी बीसीसीआयने नियुक्त केलेले लोकपाल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पांड्या व राहुल या दोघांनीही लोकपाल डी के जैन यांच्यासमोर आपली बाजू मांडली होती. त्यावर अहवाल सादर करत लोकपाल जैन यांनी दोघांना शिक्षा सुनावली होती. जैन यांनी सुनावलेल्या शिक्षेनुसार दोघांनाही शहीद जवानांच्या 10 कुटुंबांना प्रत्येकी एक लाख आणि अंध क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी 10 लाखांचा निधी देण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत त्यांना देण्यात आली होती.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकने अंध क्रिकेटपटूंच्या संघटनेला 10 लाख रुपये दिले आहेत, परंतु दहा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना त्याने अद्याप मदत केलेली नाही. त्याने बीसीसीआयलाच शहीद जवानांच्या दहा कुटुंबाची नावे सुचवण्यास सांगितले आहे. 

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय? करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''कुटुंबीयही  किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडूहार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं. 

 

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6लोकेश राहुलबीसीसीआय