Join us  

Hardik Pandya Shami Conway Video, IPL 2022 CSK vs GT Live: मोहम्मद शमीच्या प्लॅनमध्ये अडकला CSKचा डेवॉन कॉनवे; तिसऱ्याच षटकांत पाठवलं तंबूत

तिसऱ्या षटकात शमीने एक महत्त्वाचा बदल केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 4:35 PM

Open in App

Hardik Pandya Shami Conway Video, IPL 2022 CSK vs GT Live: गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय केला. गुजरातचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यात पटाईत असल्याची कल्पना असूनही धोनी हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर चेन्नईच्या संघाकडून डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड ही सलामीवीरांची जोडी मैदानात उतरली. डेवॉन कॉनवे दमदार फॉर्ममध्ये असल्याने गुजरात व मोहम्मद शमीने त्याच्यासाठी प्लॅन बनवला आणि त्यात तो बरोबर अडकला.

डेवॉन कॉनवेला पहिल्या षटकांत मोहम्मद शमीने ओव्हर द विकेट (स्टंपच्या डाव्या बाजूने) गोलंदाजी केली. त्यात त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्यानेही त्याला तशीच गोलंदाजी केली. या भेदक आणि शिस्तबद्ध माऱ्याला कंटाळून तिसऱ्या षटकात तो मोठा फटका खेळणार याचा गुजरातच्या संघाला अंदाज होताच. त्यामुळे तिसऱ्या षटकासाठी शमीने राऊंड द विकेट (स्टंपच्या उजव्या बाजूने) गोलंदाजी केली आणि अपेक्षित निकाल गुजरातच्या संघाला मिळाला. चेंडू स्विंग झाला, कॉनवे चाल करून पुढे आला, पण फटका खेळताना चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू थेट बॅटला लागून किपरकडे कॅच गेला. पाहा Video-

गुजरात टायटन्स: वृद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, एन जगदीसन, एमएस धोनी, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथीशा पाथिराना, मुकेश चौधरी

टॅग्स :आयपीएल २०२२मोहम्मद शामीचेन्नई सुपर किंग्सहार्दिक पांड्या
Open in App