Join us  

हार्दिक पंड्याने जाहीर केलं आपलं पहिलं प्रेम

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून कनेक्शन आहे. बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांची प्रेमप्रकरण चांगलीच गाजली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 4:00 PM

Open in App
ठळक मुद्देहार्दिकचे नावही बऱ्याच मॉडेलबरोबर जोडले गेले आहे.

लंडन : माणूस प्रेमात कितीदा पडू शकतो, यावर वाद होऊ शकतो, पण प्रत्येक व्यक्ती आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपलं पहिलं प्रेम जाहीर केलं आहे. 

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून कनेक्शन आहे. बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांची प्रेमप्रकरण चांगलीच गाजली आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे प्रेमप्रकरण बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर होते. त्यानंतर कोहलीने तिच्याशी लग्नही केले. हार्दिकचे नावही बऱ्याच मॉडेलबरोबर जोडले गेले आहे.

... पण तुम्ही जसं विचार करताय तसं नक्कीच काही नाही. कारण हार्दिकने दिनेश कार्तिकबरोबर फोटो आपल्या ट्विटर अकाऊंवर टाकला असून त्याखाली माझं पहिलं प्रेम, असं लिहिलं आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्यादिनेश कार्तिकक्रिकेट