Hardik Pandya Helmet Umran Malik, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याच्या डोक्यावरील हेल्मेटला चेंडू आदळला; पत्नी नताशाची रिअँक्शन झाली व्हायरल

उमरान मलिकने अतिशय वेगाने टाकला होता बाऊन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:06 AM2022-04-12T00:06:54+5:302022-04-12T00:08:14+5:30

whatsapp join usJoin us
hardik pandya ball hit on helmet by umran malik bouncer hot wife natasa stankovic reaction goes viral gt vs srh ipl 2022 | Hardik Pandya Helmet Umran Malik, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याच्या डोक्यावरील हेल्मेटला चेंडू आदळला; पत्नी नताशाची रिअँक्शन झाली व्हायरल

Hardik Pandya Helmet Umran Malik, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याच्या डोक्यावरील हेल्मेटला चेंडू आदळला; पत्नी नताशाची रिअँक्शन झाली व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya Helmet Umran Malik, IPL 2022 SRH vs GT Live:  IPL 2022 मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना चकित करणारा सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा उमरान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला. सोमवारी त्याने गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्धच्या सामन्यात ताशी १५० किमीचा आकडाही पार केला. उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीचा एक फटका हार्दिक पांड्यालाही बसला. सामन्यात उमरान मलिकचा वेगवान चेंडू थेट हार्दिक पांड्याच्या हेल्मेटला लागला आणि त्यानंतर हार्दिकची पत्नी नताशाच्या काळजाचा ठोकाच चुकला.

उमरान मलिक आपला सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याने सरळ बाऊन्सरने सुरुवात केली. बाऊन्सर थेट हार्दिक पांड्याच्या हेल्मेटवर आदळला. त्याला तो चेंडूने जोरात लागला पण हेल्मेटवर चेंडू लागल्याने त्याने धक्का सहन केला. हार्दिकला चेंडू लागल्याचे पाहताच फिजिओ डग आऊटमधून धावत मैदानावर आले. हार्दिक पांड्यासोबत हा प्रकार घडला, तेव्हा त्याची पत्नी नताशाही स्टँडमध्ये उपस्थित होती. नताशा आश्चर्याने आणि काळजीने मैदानात पाहू लागली. त्यावेळच्या तिच्या रिअँक्शनचा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

दरम्यान, त्यानंतर हार्दिकने पुन्हा खेळायला सुरूवात केली आणि संयमी अर्धशतक ठोकले. तो ४२ चेंडूत ५० धावा काढून नाबाद राहिला. त्याने अभिनव मनोहरच्या साथीने संघाला १६२ धावांचा पल्ला गाठून दिला.

Web Title: hardik pandya ball hit on helmet by umran malik bouncer hot wife natasa stankovic reaction goes viral gt vs srh ipl 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.