Join us  

हार्दिक पंड्याच्या साखरपुड्याची गोष्ट ऐकून त्याच्या वडिलांनाच बसला धक्का, केला मोठा खुलासा...

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी दुबईमध्ये साखरपुडा केला. त्यावेळी त्यांचे काही निकटवर्तीय सोबत होते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 4:44 PM

Open in App

मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. ही गोष्ट त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरही केली. पण या साखरपुड्याची माहिती हार्दिकच्या घरच्यांनाही नव्हती. याबाबतचा मोठा खुलासा हार्दिकच्या वडिलांनीच आता केला आहे.

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा प्रेमाच्या मैदानात त्रिफळा उडाला. नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली आहे. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी दुबईमध्ये साखरपुडा केला. त्यावेळी त्यांचे काही निकटवर्तीय सोबत होते. त्यानंतर हार्दिकने नताशा स्टेंकोविकसोबतची तीन छायाचित्रे आणि एक व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यातील एका फोटोमध्ये नताशा साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे.

हार्दिकचे वडिल हिमांशू पंड्या यांनी यावेळी सांगितले की, " नताशा ही एक चांगली मुलगी आहे. आम्ही नताशाला मुंबईमध्ये बऱ्याचदा भेटलो आहोत. हार्दिक आणि नताशा हे दुबईला सुट्टी एन्जॉय करायला जात आहेत, हे आम्हाला माहिती होते. पण हे दोघे साखरपुडा करणार आहेत, ही गोष्ट आम्हालाही माहिती नव्हती."

हार्दिकचे वडिल पुढे म्हणाले की, " जेव्हा आम्हाला हार्दिक आणि नताशा यांच्या साखरपुड्याची गोष्ट समजली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. ही गोष्ट समजल्यावर माझे हार्दिकबरोबर बोलणेही झाले आहे. आतापर्यंत त्यांनी लग्नाची तारीख ठरवली नसल्याचेही त्यांनी सांगतिले." 

सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड एल. गोनीसोबत सहभाग घेतला होता.

हार्दिकने नववर्षाचे स्वागत गर्लफ्रेंड नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत केले होते. तसेच तिच्यासोबतचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याने त्याखाली एक मजेशीर कमेंट्सही केली होती. ''नव्या वर्षाची सुरुवात मी माझ्या फायरवर्क (फटाका)सोबत करत आहे.'' असे त्या कमेंट्समध्ये त्याने म्हटले होते.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच