तिसऱ्या कसोटीसाठी पूर्ण फिट होणे कठीण - वॉर्नर

डावाची सुरुवात करणाऱ्या जो बर्न्स व मॅथ्यू वेड यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. वॉर्नर म्हणाला, ‘मला  सराव सत्रात सहभागी ‌व्हायचे आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:18 AM2021-01-03T05:18:30+5:302021-01-03T05:18:43+5:30

whatsapp join usJoin us
Hard to fit in for the third Test - Warner | तिसऱ्या कसोटीसाठी पूर्ण फिट होणे कठीण - वॉर्नर

तिसऱ्या कसोटीसाठी पूर्ण फिट होणे कठीण - वॉर्नर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्ण फिटनेस मिळविणे कठीण आहे, असे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे. दरम्यान, निवड समिती व संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्याने सांगितले. 
वॉर्नरला भारताविरुद्ध दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान ग्रोईनमध्ये दुखापत झाली होती. तो ७ ते ११ जानेवारी या कालावधीत भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे फिट होणे कठीण भासत आहे. त्याला मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळता आले नाही. 
डावाची सुरुवात करणाऱ्या जो बर्न्स व मॅथ्यू वेड यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. वॉर्नर म्हणाला, ‘मला  सराव सत्रात सहभागी ‌व्हायचे आहे. 

वॉर्नरने केली स्मिथची पाठराखण
n सर्वच खेळाडूंचा फॉर्म कधी ना कधी हरवत असतो. फॉर्मात नसल्याचे स्वीकारायला हवे आणि स्टीव्ह स्मिथही त्यापेक्षा वेगळा नाही. वॉर्नरने त्याचा माजी कर्णघार स्मिथच्या भारताविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेतील निराशाजनक फॉर्मची तुलना ॲशेस २०१९ मध्ये त्याच्या फॉर्मसोबत केली. स्मिथ सध्याच्या मालिकेत संघर्ष करीत आहे. 
n सनरायझर्स हैदराबाद संघाचा सहकारी टी. नटराजनची भारतीय संघात निवड झाल्यामुळे आनंद झाला,  वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने एकाच लेंग्थवर मारा करू शकेल किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.

Web Title: Hard to fit in for the third Test - Warner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.