Join us  

Video : 11 वर्षांपूर्वीच्या 'त्या' कृत्याचा हरभजन सिंगला होतोय पश्चाताप

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या पहिल्या हंगामात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्याकडून एक चूक झाली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 2:00 PM

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या पहिल्या हंगामात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्याकडून एक चूक झाली होती आणि 11 वर्षांनंतर त्याला त्याचा पश्चाताप होत आहे. 2008 मध्ये हरभजनने भारताचा जलदगती गोलंदाज एस श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना संपल्यानंतरची ही घटना. तेव्हा भज्जी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होता आणि श्रीसंत पंजाब संघाकडून खेळत होता. या घटनेची आठवण करताना, मला तसं करायला नको होतं, अशी कबुली हरभजनने दिली.

आयुष्यात मागे जाऊन एक गोष्ट बदलण्याची संधी मिळाली तर ती घटना बदलण्याची इच्छा हरभजनने व्यक्त केली. हरभजनने एका यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. तो म्हणाला,''त्या सामन्यानंतर श्रीसंत आणि माझ्यात जे घडले त्याची आजची चर्चा केली जाते. आयुष्यात मागे जाऊन काही बदलण्याची संधी मिळाली, तर मी तो प्रसंग नक्की बदलेन. मी तसं करायला नको होतं.'' 

हरभजन सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे आणि त्याच्या नावावर आयपीएलची चार जेतेपद आहेत. यातील तीन जेतेपद ही त्याने मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेली आहेत. दुसरीकडे 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिगं प्रकरणात अडकल्यानंतर श्रीसंत क्रिकेटपासून दूरच आहे. बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली आहे.  

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :हरभजन सिंगश्रीसंतआयपीएल