Join us

हरभजन सिंग म्हणतो, भारतीयांना कोरोना लसीची खरंच गरज आहे का?; नेटिझन्सनं घेतला गणिताचा क्लास!

हरभजन सिंगनं ( Harbhajan Singh) खरंच भारतीयांना कोरोना लसीची गरज आहे का? असा सवाल करणारे ट्विट केले.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 3, 2020 12:56 IST

Open in App

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत. त्यात नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याचा आढावा घेणारा दौरा केला. त्यामुळे सर्व भारतीयांना कोरोना लसीबाबतच्या आनंदवार्तेची प्रतीक्षा आहे. पण, हरभजन सिंगनं ( Harbhajan Singh) खरंच भारतीयांना कोरोना लसीची गरज आहे का? असा सवाल करणारे ट्विट केले. त्यावरून नेटिझन्सनी भारताच्या फिरकीपटूचा गणिताचा क्लास भरवला.

Pfizer आणि Moderna यांनी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला आहे, परंतु या लसी फुल प्रुफ नाही. भज्जीनं याबाबतचं ट्विट शेअर केलं. त्यात त्यानं काही आकडेवारी मांडली. PFIZER AND BIOTECH लस - ९४% अचूकताModerna लस :  ९४.५% अचूकता Oxford लस : ९०% अचूकता यावरून भज्जी पुढे म्हणतो की लसीशिवाय भारतीयांचा रिकव्हरी रेट हा ९३.६% आहे... मग खरंच भारतीयांना लसीची गरज आहे का?  भज्जीच्या या बेजबाबदार ट्विटवरून नेटिझन्स चांगलेच खवळले आहेत.   

टॅग्स :हरभजन सिंगकोरोना वायरस बातम्या