Join us  

लॉकडाऊनमध्ये मुलीसोबत वेळ घालवीत असल्यामुळे रहाणे खूश

रहाणे या व्हिडिओमध्ये व्यायाम करताना व पुस्तक वाचतानाही दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 2:48 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने म्हटले की, ‘कोविड-१९ महामारीमुळे लॉकडाऊनध्ये माझ्यासाठी एक सकारात्मक बाब घडली असून मी माझ्या मुलीसोबत पूर्ण वेळ घालवीत आहे.’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर रहाणेचा व्हिडिओ संदेश पोस्ट केला असून त्यात तो आपली सहा महिन्यांची मुलगी आर्यासोबत वेळ घालविण्यासोबतच जेवण बनविण्यासाठी पत्नी राधिकाची मदत करीत असल्याचे दिसत आहे.

रहाणे या व्हिडिओमध्ये व्यायाम करताना व पुस्तक वाचतानाही दिसत आहे. भारतातर्फे ६५ कसोटी सामने खेळणाऱ्या रहाणेची दिवसाची सुरुवात व्यायामाने होते आणि त्यानंतर तो आर्यासोबत वेळ घालवितो. दरम्यान, तो कराटेचाही सराव करीत आहे.लिव्हरपूलचा खेळाडू डालग्लिशला कोरोनाची लागण

लंडन : लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा महान खेळाडू केनी डालग्लिशची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण त्याच्यात कुठलेही लक्षण दिसून आलेले नाही. त्याच्या कुटुंबाने शुक्रवारी ही माहिती दिली. माजी स्कॉटिश आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर डालग्लिशला कोरोनाच्या उपचारासाठी बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ६९ वर्षीय खेळाडूने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सेल्टिक फुटबॉल क्लबपासून केली होती. कुटुंबाने स्पष्ट केले की, ‘कुठलेही लक्षण त्याच्यामध्ये दिसत नव्हते तरी त्याची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला.लॉकडाऊन नियमाचे केले उल्लंघनमिळाले सामन्याचे तिकीट

अथेन्स : ग्रीसचा फुटबॉल क्लब एईके अथेन्सचा चाहता देशात कोरोना व्हायरसमुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडला आणि नियमांचे उल्लंघन केले. मात्र यानंतर त्याला अनोखे बक्षीसही मिळाल्याने सध्या त्याची चर्चा क्रीडाक्षेत्रात रंगत आहे. या चाहत्याने दंड भरल्यानंतर क्लबने त्याला बक्षीस म्हणून पुढील मोसमासाठी मायदेशातील लढतींचे पास दिले. जवळजवळ ६० वर्षांचे वय असलेला हा इसम अथेन्सच्या उपनगरातील फिलाडेलफियाजवळ संघाच्या नव्या स्टेडियमचे बांधकाम बघण्यासाठी जात होता. त्याच्याकडे घराबाहेर पडण्यासाठी आवश्यक कागदपत्र नव्हते. त्याला १५० डॉलरचा दंड भरावा लागला. संघाचे मालक दिमत्रिस मेलिस्सानिदिस यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी क्लबला दंडाची रक्कम भरण्यासह पुढील लढतीसाठी पास देण्याचे निर्देश दिले.पाक खेळाडूंंनी केली वेतन कपातीची मानसिक तयारी

कराची : जगभरामध्ये अत्यंत धोकादायक बनलेल्या कोरोना विषाणूचे संकट आणखी काही महिने कायम राहिल्यास करारबद्ध खेळाडू वेतन कपातीस मानसिकरीत्या तयार असल्याचे मत पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार अझहर अली याने शनिवारी व्यक्त केले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी बोलताना अझहर अली याने सांगितले की, ‘जगभरामध्ये कोरोना विषाणूचे संकट आणखी गडद होत असल्याची जाणीव सर्व सहकाऱ्यांना आहे. त्यामुळेच सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे.’ 

टॅग्स :अजिंक्य रहाणेकोरोना वायरस बातम्या