Join us

हॅपी बर्थ डे विराट...

By admin | Updated: November 5, 2016 00:00 IST

Open in App

कर्णधार महेंद्र सिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर विराटवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत विराटने टीम इंडियाला अव्वल स्थानी आणलं आहे.

विराट खेळाडू म्हमून खूप प्रसिद्ध असला तरी तो सामाजिक भानही तितकंच जपतो. "विराट कोहली फाऊंडेशन" ही एनजीओ गरीब नागरिकांसाठी काम करते.

कर्णधार म्हणून लागोपाठ तीन शतक ठोकणारा विराट पहिलाच कर्णधार आहे. तसेच कर्णधार म्हणून दोन द्विशतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेमप्रकरणाबद्दल सर्वांनाचा माहित आहे त्याची अनेकवेळा चर्चा होत असते. मात्र लहानपणापासून विराटचा क्रश म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर. लहानपणापासून करिष्मा मला आवडते असं विराटने अनेकदा सांगितलं आहे.

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोठावणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू आहे.

सर्वात जलद २० शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.

चिकू हे विराटचे टोपणनाव असून सचिन पासून टीम इंडियातील सर्व सहकारी त्याला याच नावाने संबोधतात.

२००६ साली विराटने पहिला रणजी सामना खेळला. त्याच दिवशी वडिलांचे निधन होऊनही विराट खंबीरपणे मैदानावर उतरला आणि ९० दावा फटकावत वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि युवा खेळाडू विराट कोहली याचा आज वाढदिवस. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी नवी दिल्ली येथे त्याचा जन्म झाला. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊनया विराटबद्दलच्या काही खास गोष्टी..