Join us  

Suresh Rainaच्या मागणीनंतर BCCI चा महत्त्वाचा निर्णय; IPL 2022त अनसोल्ड राहिलेले ७ भारतीय परदेशी लीगमध्ये खेळणार

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात अनसोल्ड राहिलेल्या Mr. IPL सुरेश रैना ( Suresh Raina) याने काही दिवसांपूर्वी BCCIकडे परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 2:15 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात अनसोल्ड राहिलेल्या Mr. IPL सुरेश रैना ( Suresh Raina) याने काही दिवसांपूर्वी BCCIकडे परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली होती. बीसीसीआयच्या नियमानुसार फक्त सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेलेच भारतीय खेळाडू परदेशातील लीगमध्ये खेळू शकतात. त्यामुळेच युवराज सिंग, मनप्रीत गोनी, इरफान पठाण, युसूफ पठाण, मुनाफ पटेल, उन्मुक्त चंद यांनी निवृत्ती घेत परदेशी लीगमध्ये प्रतिनिधित्व केले. पण, नियम बदलून जे आयपीएल किंवा राष्ट्रीय स्पर्धेत खेळत नाहीत, अशा खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी रैनाची मागणी होती. त्यादृष्टीने बीसीसीआयने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे..

हनुमा विहारी आणि अभिमन्यू इश्वरन यांच्यासह सात भारतीय खेळाडू बांगालदेशच्या लिस्ट ए ( ५० षटकांच्या) ढाका प्रीमिअर लीग ( DPL) मध्ये खेळणार आहेत. या दोघांसह परवेझ रसूल, बाबा अपराजित, अशोक मेनारिया, चिराग जानी आणि गुरिंदर सिंग हे सात खेळाडू DPL मध्ये खेळणार आहेत. हे सर्व खेळाडू IPL 2022च्या लिलिवात अनसोल्ड राहिले होते. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विहारीचा समावेश होता. भारताने ही मालिका २-० अशी जिंकली. आता तो हैदराबाद येथून ढाकाला रवाना होणार आहे. तो अबहानी लिमिटेड संघाकडून खेळणार आहे. त्याला पहिल्या तीन सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्याच्यासह अफगाणिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज नाजिबुल्लाह झाद्रान हाही या संघाकडून खेळणार आहे.

इश्वरन हा बंगाल संघाचा कर्णधार आहे आणि तो DPLमध्ये प्राईम बँक संघाकडून खेळणार आहे. रसूल हा शेख जमाल धनमोंडी, अपराजित हा रुपगंज टायगर्स, मेनारिया हा खेलघर, जानी हा लीजंड्स ऑफ रुपगंज आणि गुरिंदर हा गाझी ग्रुप या संघाकडून खेळणार आहे. विहारी, इश्वरन, अपराजित , मेनारिया व रसूल हे २०१९-२० या पर्वातही DPL मध्ये खेळले होते. याआधी दिनेश कार्तिक, मनोज तिवारी व युसूफ पठाण हेही DPL मध्ये खेळले होते. भारतीयांसह यंदा पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज व झिम्बाब्वेचा सिकंदर रजा हेही या लीगमध्ये खेळणार आहेत.    

टॅग्स :बीसीसीआयबांगलादेश
Open in App