Join us  

गुजरात टायटन्ससाठी ७.४ कोटींचा खेळाडू गेम चेंजर ठरेल, हार्दिक तर...! आशिष नेहराचा दावा 

नेहराच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सच्या युवा खेळाडूंनी मागील दोन पर्वांत दमदार कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 3:48 PM

Open in App

इंडियन प्रीमियर लीगच्या  ( IPL 2024 ) आगामी हंगामासाठी शाहरुख खान ( Shahrukh Khan ) हा फिनिशर म्हणून त्यांच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल, असा विश्वास गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी व्यक्त केला आहे. नेहराच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सच्या युवा खेळाडूंनी मागील दोन पर्वांत दमदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये नेहरासाठी युवा खेळाडूंचे व्यवस्थापन करणे हे आव्हानात्मक काम असेल कारण ते अननुभवी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. फ्रँचायझीला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात हार्दिक पांड्यासाठी पर्यायी खेळाडू शोधण्याची गरज आहे.

मी त्याला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, कारण... ; आशिष नेहराचं मोठं विधान

२०२२ च्या आयपीएल चॅम्पियन्स गुजरातने IPL 2024 लिलावात काही तरुण प्रतिभावान खेळाडूंना आपल्या ताफ्यात मोठी रक्कम देऊन दाखल करून घेतले आहे. गेल्या काही सीझनमध्ये पंजाब किंग्जसाठी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानसाठी त्यांनी आयपीएलमध्ये ७.४ कोटी रक्कम मोजले. तामिळनाडूच्या फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीत ३३ आयपीएल सामन्यांमध्ये ४२६ धावा केल्या आहेत. त्याला आगामी मोसमात गुजरातसाठी कामगिरीचा आलेख उंचावण्याची गरज आहे.

शाहरुख येत्या हंगामात टायटन्ससाठी फिनिशरची मोठी भूमिका बजावेल, असा अंदाज नेहराने व्यक्त केला आहे. "आम्ही शाहरुख खानला मुख्य अभिनेता बनताना पाहणार आहोत," असे नेहराने सांगितले.  भारताच्या दिग्गज वेगवान गोलंदाजाने सुचवले की खेळाडूंनाही त्यांच्या शरीराची काळजी घ्यावी लागेल कारण मे महिन्यात त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण असेल.

"आयपीएल ही खूप मोठी स्पर्धा आहे. आम्ही फक्त भरपूर सामने खेळत आहोत. मे आणि जूनमध्ये परिस्थितीही कठीण असते. खेळाडूंना, विशेषत: वेगवान गोलंदाजांसाठी ते कठीण जाईल. दुखापतीही होऊ शकतात. त्यामुळे आमच्याकडे असलेला प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे,” असेही तो पुढे म्हणाला.

दरम्यान, स्पेन्सर जॉन्सन आणि अजमतुल्ला ओमरझाई हे दोन नवीन खेळाडू टायटन्ससाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असेही त्याने सुचवले. "स्पेन्सर जॉन्सनने ट्वेंटी-२० लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अझमतुल्ला ओमरझाईकडे अष्टपैलू म्हणून सर्व कौशल्ये आहेत आणि आम्हाला खूप आशा आहे की तो आयपीएलमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल," असे नेहरा म्हणाला. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत, स्पिनर रशीद खानला टायटन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करावे लागेल.   

 

 

टॅग्स :आयपीएल २०२४गुजरात टायटन्सआशिष नेहराहार्दिक पांड्या