छपरी, फेक इंजरी! मोहम्मद शमीने IPL 2024 पूर्वी लाईक केली 'ती' पोस्ट, जोडला हार्दिकशी संबंध 

मोहम्मद शमी ( Mohammed Shami)  दुखापतीमुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळू शकणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:35 PM2024-03-14T12:35:16+5:302024-03-14T12:35:57+5:30

whatsapp join usJoin us
Gujarat Titans bowler Mohammed Shami Likes Post Talking About India Player Who Faked Injury In World Cup To Play In IPL  | छपरी, फेक इंजरी! मोहम्मद शमीने IPL 2024 पूर्वी लाईक केली 'ती' पोस्ट, जोडला हार्दिकशी संबंध 

छपरी, फेक इंजरी! मोहम्मद शमीने IPL 2024 पूर्वी लाईक केली 'ती' पोस्ट, जोडला हार्दिकशी संबंध 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami)  दुखापतीमुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळू शकणार नाही. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो मैदानापासून दूर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान त्याला अकिलीस टेंडनची दुखापतही झाली होती. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आणि त्याने शमीने सोशल मीडियावर त्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स दिले.  


मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या फिटनेसची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, सर्वांना नमस्कार! मी तुम्हाला माझ्या पुनर्प्राप्तीबद्दल सर्व अपडेट देऊ इच्छितो. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि माझे टाके काढून १५ दिवस झाले आहेत. माझ्या प्रकृतीत सुधारणा होतेय आणि   पुनर्प्राप्तीच्या पुढील टप्प्यावर जाण्यासाठी मी तयार आहे.


पोस्टला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, शमी दुखापत असूनही वर्ल्ड कप खेळत होता, त्यानंतर एका खेळाडूने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी वर्ल्ड कपदरम्यान दुखापत झाल्याचे नाटक केले. युजरने येथे हार्दिक पांड्याला लक्ष्य केले. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'शमी भाईने वर्ल्ड कपदरम्यान वेदना होत असतानाही त्याचे १०० टक्के योगदान दिले, त्यानंतर एक छपरी, आहे ज्याने स्वत:ला आयपीएलसाठी उपलब्ध ठेवण्यासाठी दुखापतीचा बनाव केला.'


मोहम्मद शमीने ही कमेंट लाईक केली आहे. यानंतर तो फोटो व्हायरल झाला.  

Web Title: Gujarat Titans bowler Mohammed Shami Likes Post Talking About India Player Who Faked Injury In World Cup To Play In IPL 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.