Join us

जीएसटीचा दणका, बीसीसीआयने भरला ४४ लाखांच्या कराचा पहिला हप्ता

केंद्र सरकारने १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर देशातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयने ४४ लाखांच्या कराचा पहिला हप्ता भरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 03:58 IST

Open in App

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर देशातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयने ४४ लाखांच्या कराचा पहिला हप्ता भरला. जुलै महिन्यात ४४,२९,५७६ रुपये कर भरल्याचे बीसीसीआयने वेबसाईटवर म्हटले आहे. भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना पाच महिन्यांचे ६० लाख रुपये वेतन देण्यात आले, तर काही खेळाडूंना २०१५-१६ च्या मोसमातील सामन्यांतून झालेल्या शुद्ध नफ्यातील त्यांचा वाटा देण्यात आला. स्टुअर्ट बिन्नीला ९२ लाख, हरभजनसिंग याला ६२ लाख, डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला ३७ लाख आणि वेगवान गोलंदाज उमेश यादवला ३५ लाख रुपये देण्यात आले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआय