सचिनपेक्षाही विराट सरस; स्टीव्ह स्मिथ कोहलीच्या आसपासही नाही - केव्हिन पीटरसन 

वर्तमान क्रिकेटमध्ये स्मिथ व कोहली जगातील अव्वल फलंदाज आहेत, पण पीटरसनच्या मते आॅस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार कोहलीच्या जवळपासही नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:23 AM2020-05-17T00:23:56+5:302020-05-17T07:42:22+5:30

whatsapp join usJoin us
Greater than Sachin; Not even around Steve Smith Kohli - Kevin Peterson | सचिनपेक्षाही विराट सरस; स्टीव्ह स्मिथ कोहलीच्या आसपासही नाही - केव्हिन पीटरसन 

सचिनपेक्षाही विराट सरस; स्टीव्ह स्मिथ कोहलीच्या आसपासही नाही - केव्हिन पीटरसन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : विराट कोहलीच्या शानदार कामगिरीपुढे आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ कुठे जवळपासही नाही, असे इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिन पीटरसनने म्हटले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय कर्णधाराने महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर सोडले आहे, असेही पीटरसन म्हणाला.
वर्तमान क्रिकेटमध्ये स्मिथ व कोहली जगातील अव्वल फलंदाज आहेत, पण पीटरसनच्या मते आॅस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार कोहलीच्या जवळपासही नाही. पीटरसनने झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू पॉमी एमबांग्वासोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये म्हटले की, ‘कोहली शानदार आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. सातत्याने दडपण असतानाही तो भारताला सामने जिंकून देतो.’
एमबांग्वाने पीटरसनला कोहली व तेंडुलकर यांच्यापैकी कुणा एकाची निवड करण्यास सांगितले त्यावेळी इंग्लंडचा माजी खेळाडू म्हणाला, ‘मी पुन्हा कोहलीचे नाव घेईन. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा रेकॉर्ड शानदार आहे. त्यावेळी त्याची सरासरी ८० ची आहे. त्याने जास्तीत जास्त शतके हे लक्ष्याचा पाठलाग करताना झळकावलेले आहेत.’
पीटरसन पुढे म्हणाला, ‘कोहली सातत्याने भारताला सामने जिंकून देत आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याची कामगिरी आणखी उल्लेखनीय ठरत आहे.’ कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावली आहेत आणि तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५० पेक्षा अधिक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथची सरासरी कोहलीच्या तुलनेत सरस आहे. स्मिथने ७३ सामन्यात ६२.७४ च्या सरासरीने ७,२२७ धावा केल्या आहेत.

Web Title: Greater than Sachin; Not even around Steve Smith Kohli - Kevin Peterson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.