Join us

अजिंक्य रहाणेची शानदार खेळी; विराट कोहलीने केले कौतुक

दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने ट्विट केले,‘आमच्यासाठी आणखी एक शानदार दिवस.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 07:05 IST

Open in App

नवी दिल्ली : पितृत्व रजेवर असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या स्थानी संघाचे नेतृत्व करीत असलेल्या अजिंक्य राहणेची प्रशंसा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील त्याचे शतक सर्वोत्तम असल्याचे कोहली म्हणाला. रहाणेने दुसऱ्या दिवशी नाबाद १०४ धावा केल्या असून रवींद्र जडेजासोबत (४०*) सहाव्या विकेटसाठी अभेद्य शतकी भागीदारी केली.

दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने ट्विट केले,‘आमच्यासाठी आणखी एक शानदार दिवस. कसोटी क्रिकेट आपल्या सर्वोत्तम रुपात. जिंक्यची (अजिंक्य रहाणे) सर्वोत्तम श्रेष्ठ खेळी.’ भारताने सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळला होता.

 

टॅग्स :अजिंक्य रहाणे