Join us  

"विराटला चुकताना बघून आनंद झाला"

विराट कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजाला दडपणाखाली चुका करताना बघितल्यामुळे आनंद झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 4:16 AM

Open in App

‘विराट कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजाला दडपणाखाली चुका करताना बघितल्यामुळे आनंद झाला,’ अशीप्रतिक्रिया न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने व्यक्त केली. बोल्टने १२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. यजमान संघाने कसोटी मालिकेत कोहलीला मोठी खेळी करण्याची संधी दिली नाही. चार डावांमध्ये त्याला २० धावांची वेस ओलांडता आली नाही.कोहलीला रोखण्यासाठी कुठल्या रणनीतीचा वापर केला. याबाबत बोल्ट म्हणाला,‘कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, यात कुठली शंका नाही. त्याला अधिक चौकार मारण्याची संधी न देणे आणि त्याच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करणे आमची रणनीती होती. तो निश्चितच चांगल्या पद्धतीने खेळतो. त्याच्या बॅटला लगाम घातल्यानंतर त्याला चुका करताना बघणे शानदार होते.’भारतीय फलंदाजांना हवेत मूव्ह करणाऱ्या चेंडूंमुळे अडचण भासली. याबाबत बोल्ट म्हणाला,‘कदाचित त्यांना भारतातील संथ खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय आहे. त्यांना येथे जुळवून घेण्यास वेळ लागला. त्याचप्रमाणे जर मी भारतात गोलंदाजी केली तर तेथील परिस्थिती माझ्यासाठी वेगळी असेल.’>जेमीसन, वॅगनर यांचा कडवा प्रतिकारपहिल्या डावात भारताने न्यूझीलंडची ८ बाद १७७ अशी अवस्था करुन मोठी आघाडी मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. पण जेमीसन व वॅगनर (२१) यांनी नवव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करीत पाहुण्या संघाच्या आशा धुळीस मिळविल्या. जडेजाने चहापानापूर्वी डीप मिडविकेटला वॅगनरचा शानदार झेल टिपत ही भागीदारी संपुष्टात आणली. पहिल्या सत्राप्रमाणे भारताने दुसºया सत्रातही पाच बळी घेतले. बुमराहने उपाहारानंतर बीजे वॉटलिंग (०) व टीम साऊदी (०) यांना झटपट तंबूत परतवले. जडेजाने त्यानंतर ग्रँडहोमला (२६) बोल्ड केले. वॅगनर व जेमीसन यांनी त्यानंतर जवळजवळ १२ षटके भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. जेमीसनचे पहिले कसोटी अर्धशतक केवळ एका धावेने हुकले.सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. लॅथमने १२२ चेंडूंना सामोरे जाताना ५२ धावांची खेळी केली पण तो बुमराहच्या गोलंदाजीवर चाडपडत असल्याचे चित्र दिसले. शमी, बुमराह व उमेश यादव या वेगवान त्रिकुटाने अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजी केली. उमेशने टॉम ब्लंडेलला (३०) पायचित करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. बुमराहने त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला (३) यष्टिरक्षक पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. रॉस टेलरला (१५) संयम राखता आला नाही. जडेजाच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. या मालिकेत आतापर्यंत अपयशी ठरलेल्या शमीने त्यानंतर लॅथमला बोल्ड केले. लॅथमच्या १२२ चेंडूंच्या खेळीमध्ये पाच चौकारांचा समावेश आहे. शमीने त्यानंतर हेन्री निकोल्स (१४) याला स्लिपमध्ये तैनात कर्णधार विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले.> संक्षिप्त धावफलकभारत (पहिला डाव) : ३६ षटकांत सर्वबाद २४२ धावा.न्यूझीलंड (पहिला डाव) : ७३.१ षटकांत सर्वबाद २३५ धावा (टॉम लॅथम ५२,कायले जेमीसन ४९, टॉम ब्लंडेल ३०; मोहम्मद शमी ४/८१, जसप्रीत बुमराह ३/६२,रवींद्र जडेजा २/२२.)भारत (दुसरा डाव) : ३६ षटकांत ६ बाद ९० धावा (चेतेश्वर पुजारा २४, पृथ्वी शॉ १४, विराट कोहली १४, हनुमा विहारी खेळत आहे ५, रिषभ पंत खेळत आहे १; टेÑंट बोल्ट ३/१२)