'क्रिकेटच्या देवा'च्या हाती बॅटऐवजी 'फुंकणी'; चुलीवर नेमकं शिजतंय तरी काय?

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकरने काही दिवसांपूर्वीच आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:30 PM2023-05-05T18:30:30+5:302023-05-05T18:30:40+5:30

whatsapp join usJoin us
 great Sachin Tendulkar celebrated his 50th birthday with wife Anjali and daughter Sara Tendulkar  | 'क्रिकेटच्या देवा'च्या हाती बॅटऐवजी 'फुंकणी'; चुलीवर नेमकं शिजतंय तरी काय?

'क्रिकेटच्या देवा'च्या हाती बॅटऐवजी 'फुंकणी'; चुलीवर नेमकं शिजतंय तरी काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

sachin tendulkar । मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकरने काही दिवसांपूर्वीच आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. २४ एप्रिल २०२३ रोजी सचिनने त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. महान क्रिकेटपटू क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटला नवीन ओळख देणारा आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकरने त्याचा वाढदिवस कोकणात साजरा केला होता. सचिनने मराठमोळ्या संस्कृतीची ओळख असलेला एक फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये सचिन पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत दिसत आहे.

सचिनने फोटो शेअर करताना म्हटले, "तुम्ही प्रत्येक दिवशी अर्धशतक झळकावू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा त्याला सर्वात जास्त महत्त्व असते. अलीकडेच एका शांत गावात माझ्या टीमसोबत, माझ्या कुटुंबासोबत ५०वा वाढदिवस साजरा केला. अर्जुन आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने त्याची खूप आठवण येत आहे."

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ एप्रिल २०२३ रोजी आयुष्याचे अर्धशतक ठोकले. आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे अर्जुन तेंडुलकर आपल्या वडिलांसोबत कोकणात गेला नव्हता. सचिन स्वत: आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच कोकणात गेला होता. त्याने भोगवे येथील समुद्रकिनारी आयुष्याचे अर्धशतक साजरे केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title:  great Sachin Tendulkar celebrated his 50th birthday with wife Anjali and daughter Sara Tendulkar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.