GOLD MEN in DC vs LSG IPL 2022 : दिल्ली-लखनौ सामन्यात स्टेडियमवर आला 'गोल्ड मॅन'!; जवळपास १ कोटींच सोनं होतं अंगावर, Video 

GOLD MEN in DC vs LSG IPL 2022 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आयुष बदोनीने चौकार व षटकार मारून लखनौचा विजय पक्का केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:38 PM2022-04-08T17:38:20+5:302022-04-08T17:39:22+5:30

whatsapp join usJoin us
GOLD MEN! Wearing 1cr gold spotted in Indian Premier League match between Lucknow Super Giants VS Delhi Capitals, Video  | GOLD MEN in DC vs LSG IPL 2022 : दिल्ली-लखनौ सामन्यात स्टेडियमवर आला 'गोल्ड मॅन'!; जवळपास १ कोटींच सोनं होतं अंगावर, Video 

GOLD MEN in DC vs LSG IPL 2022 : दिल्ली-लखनौ सामन्यात स्टेडियमवर आला 'गोल्ड मॅन'!; जवळपास १ कोटींच सोनं होतं अंगावर, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

GOLD MEN in DC vs LSG IPL 2022 :  दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals ) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून ( Lucknow Super Giants ) पराभव पत्करावा लागला. आयपीएलच्या अन्य सामन्यांप्रमाणे याही सामन्यांत सुंदर तरुणींची उपस्थिती कॅमेरामनने टिपली, परंतु यावेळेस कॅमेरामनचा कॅमेरा अशा व्यक्तीकडे वळला की ज्याला पाहून महिलांना त्याचा हेवा वाटला असेल. या व्यक्तिच्या अंगावर जवळपास १ कोटींचं सोनं असल्याचा दावा काहींनी केला. या Gold Men चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉ ( ६१), रिषभ पंत ( ३९*) व सर्फराज खान ( ३६*) यांच्या खेळीच्या जोरावर ३ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, पृथ्वीने ज्या प्रकारे दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली होती, त्यात सातत्य राखण्यात अन्य फलंदाज अपयशी ठरले. डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल यांच्या पटापट विकेट पडल्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी कमबॅक केले व दिल्लीच्या धावगतीला वेसण घातले. रवी बिश्नोईने २ विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तरात लखनौला क्विंटन डी कॉक व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. क्विंटनने चांगली खेळी केली, परंतु ८० धावांवर तो बाद झाला. दीपक हुडा ( ११), कृणाल पांड्या ( १९*) व बदोनी ( १०*) यांनी लखनौचा विजय पक्का केला.

पाहा गोल्ड मॅनचा व्हिडीओ...

Web Title: GOLD MEN! Wearing 1cr gold spotted in Indian Premier League match between Lucknow Super Giants VS Delhi Capitals, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.