Join us  

हार्दिकला संधी द्यावी - चॅपेल

पांड्याच्या पाठीवर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली. चॅपेल पुढे म्हणाले की, ‘भारतापुढे सर्वांत मोठे आव्हान आॅस्ट्रेलियाच्या मजबूत फलंदाजीला खिंडार पाडण्याचे असेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 2:31 AM

Open in App

मेलबोर्न : ‘भारतीय संघ वर्षाच्या शेवटी ज्यावेळी आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल त्यावेळी हार्दिक पांड्याला संधी द्यायला हवी. कारण हा अष्टपैलू यजमानांच्या मजबूत फलंदाजीमुळे येणाºया आव्हानाला सामोरे जाण्यास महत्त्वाचा ठरू शकतो,’ असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. पांड्या २०१८ मध्ये कसोटी सामना खेळला नाही आणि सध्या तो पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. चॅपेल म्हणाले, ‘हार्दिक जर उपलब्ध असेल, तर भारताला अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय मिळेल. प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्याची गरज असते त्यावेळी हार्दिक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.’

पांड्याच्या पाठीवर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली. चॅपेल पुढे म्हणाले की, ‘भारतापुढे सर्वांत मोठे आव्हान आॅस्ट्रेलियाच्या मजबूत फलंदाजीला खिंडार पाडण्याचे असेल. स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्याव्यतिरिक्त मार्नस लाबुशेन स्वत:ला सिद्ध करीत आहे. आॅस्ट्रेलिया आता यशासाठी स्मिथ व वॉर्नर यांच्यावर कमी विसंबून आहे. आॅस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड व जेम्स पॅटिन्सनच्या रूपाने मजबूत वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे.’ (वृत्तसंस्था)चॅपेल म्हणाले, ‘हार्दिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्याचा अर्थ रिषभ पंतला यष्टिरक्षणासह सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. भारतीय निवड समितीसाठी फिरकीपटूची निवड करणे डोकेदुखी ठरू शकते. आर. अश्विनचा रेकॉर्ड शानदार आहे, पण आॅस्ट्रेलियात नाही. जडेजा अष्टपैलू आहे आणि गोलंदाजीमध्ये सुधारणा केल्यामुळे त्याचा दावा मजबूत झाला आहे तर कु लदीप यादव आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर उपयुक्त ठरू शकतो.’

टॅग्स :हार्दिक पांड्या