Join us  

मैदानात जा आणि सामना जिंकूनच परत ये; शार्दुल ठाकूरला दिला होता खास व्यक्तीने सल्ला

संघातील एका खास व्यक्तीला शार्दुल चांगली फलंदाजी करतो, हे माहिती होते. त्यामुळे या खास व्यक्तीने शार्दुलला मैदानात जा आणि सामना जिंकूनच परत ये, असा सल्ला दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 9:40 PM

Open in App

कटक : भारत आणि वेस्ट इंडिज याच्यातील निर्णायक तिसऱ्या लढतीत भारताच्या शार्दुल ठाकूरने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकली. पण ही दमदार फलंदाजी करण्यापूर्वी शार्दुलला एका खास व्यक्तीने सल्ला दिला होता. हा सल्ला मानत शार्दुलने सामना जिंकवून दिल्याचे पाहायला मिळाले.

विराट कोहली ८५ धावांवर बाद झाल्यावर आता भारतीय संघ सामना जिंकणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कारण त्यावेळी खेळपट्टीव रवींद्र जडेजा असला तरी दुसरा फलंदाज नव्हता. शार्दुल हा मोठे फटकेबाजी करू शकतो, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नव्हते. पण संघातील एका खास व्यक्तीला शार्दुल चांगली फलंदाजी करतो, हे माहिती होते. त्यामुळे या खास व्यक्तीने शार्दुलला मैदानात जा आणि सामना जिंकूनच परत ये, असा सल्ला दिला. शार्दुलनेही हा सल्ला मानत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

कोहली बाद झाला तेव्हा भारताची ६ बाद २८६ अशी स्थिती होती. त्यावेळी भारत हा सामना जिंकणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली होती. पण शार्दुल मैदानात आला आणि त्याने फक्त सहा चेंडूंत नाबाद १७ धावांची धडाकेबाज खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मैदानात जाण्यापूर्वी आपल्याला एका खास व्यक्तीने सल्ला दिला होता, असे शार्दुलने एका खास मुलाखतीमध्ये म्हटले आहे. याबाबत शार्दुल म्हणाला की, " जेव्हा विराट कोहली बाद झाला तेव्हा मला फलंदाजीला जायचे होते. मी फलंदाजीला निघत होतो, त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री माझ्याकडे आले आणि मला सांगितले की, मैदानात जा आणि सामना जिंकूनच परत ये. त्यांच्या या वाक्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि मी धडाकेबाज खेळी साकारत संघाला विजय मिळवून देता आला."

टॅग्स :शार्दुल ठाकूररवी शास्त्रीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज