Join us  

गेलने सहा वेळा वर्षात साजरे केलेय षटकारांचे शतक

वयाच्या 41 व्या वर्षीसुध्दा मी षटकार चांगले मारतोय यासाठी धन्यवाद द्यायला हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 1:51 PM

Open in App

वय वर्षे 41...खेळाडूंसाठी तसे हे निवृत्तीचे वय...वयाच्या पस्तीशीनंतरच खरं तर खेळाडू उतरणीला लागतात पण युनीव्हर्स बाॕस ( Universe Boss) ख्रिस गेल (Chris Gayle) याला अपवाद आहे. अजुनही तो वेगाने धावा जमवतोय आणि दणादण षटकार- चौकार मारतोय. किंग्ज इलेव्हनसाठी (Kings XI)   शुक्रवारी त्याने राजस्थान राॕयल्सविरुध्द 63 चेंडूत सहा चौकार व  आठ षटकारांसह 99 धावा केल्या. शतक हुकले पण त्याने तब्बल एक हजार षटकारांचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या स्थानावरचा गडी त्याच्यापेक्षा 311 षटकारांनी मागे आहे. गेलला गाठण्याचा प्रश्नच नाही.

युनिव्हर्स बाॕसने टी-20 सामन्यात पहिला षटकार लगावला तो 2006 मध्ये. स्टॕनफोर्ड 20-20 स्पर्धेत जमैकासाठी बर्म्युडाविरुध्द. 21 जुलै 2006 रोजीच्या त्याच्या त्या खेळीत तीन षटकार होते. तेंव्हापासून आतापर्यंत  दरवर्षी तो षटकारांची बरसात करतोय.

या क्षमतेबद्दल तो म्हणतो की वयाच्या 41 व्या वर्षीसुध्दा मी षटकार चांगले मारतोय यासाठी धन्यवाद द्यायला हवेत. मला वाटते की एवढ्या वर्षांची मेहनत आणि समर्पण याचे हे फळ आहे. मला चांगले वाटतेय. मला वाटते की हा सर्व मानसिकतेचा परिणाम आहे. ही मानसिकताच मला प्रेरीत करता आलेली आहे. मला क्रिकेट खेळताना अजुनही आनंद येतोय आणि अजूनही चांगला खेळ करायची भूक माझ्यात आहे. आयपीएल ट्राॕफी आमच्या नावावर लागावी अशी माझी इच्छा आहे. तर या गड्याने आयपीएल 2020 च्या सहा सामन्यात 276 धावा करताना 23 षटकार लगावले आहेत. 

गेलने दरवर्षी लगावलेले टी-20 षटकार 

2006 - 4

2007 - 11

2008 - 10

2009 - 21

2010 - 28

2011- 116

2012- 121

2013- 100

2014- 60

2015 - 135

2016 - 111

2017 - 101

2018 - 73

2019 - 74

2020 - 36

टॅग्स :ख्रिस गेलIPL 2020