Join us

गेलने माझा मार्ग सोपा केला , आक्रमक सलामीवीर लोकेश राहुलचे मत

फॉर्ममध्ये असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबत फलंदाजी करीत असल्याने माझे काम सोपे झाल्याचे किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलचे मत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 02:06 IST

Open in App

चेन्नई - फॉर्ममध्ये असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबत फलंदाजी करीत असल्याने माझे काम सोपे झाल्याचे किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलचे मत आहे.विरोधकांचे लक्ष्य गेल असतो. यामुळे मला क्रिझवर स्थिरावण्यास वेळ मिळतो. गेलकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तो सतत हसत राहतो व दुसऱ्यांचे मनोरंजन करतो. टी-२० त सर्वाधिक धोकादायक असलेल्या फलंदाजासोबत खेळताना माझा मार्ग सोपा होत आहे, असे राहुलने सांगितले.राहुलने यंदा सात सामन्यात २६८ धावा ठोकल्या. याआधी आम्ही दोघे आरसीबीसाठी एकत्र खेळल्याची माहिती राहुलने दिली. गेलच्या आक्रमक फटकेबाजीचा प्रभाव तुझ्या फलंदाजीवर पडला आहे काय, असे विचारताच राहुल म्हणाला, ‘आम्ही एकमेकांना चांगले समजलो आहे. (वृत्तसंस्था)खेळाचा आनंद कसा लुटायचा हे गेलकडून शिकण्यासारखे आहे. दडपणातही प्रेक्षकांचे मनोरंजक करणे सोपे नाही. गेल मात्र याला अपवाद आहे. म्हणूनच प्रतिस्पर्धी संघ त्याच्याविरुद्ध सारखा दडपणाखाली असतो.’

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेट