ऋतुराज गायकवाड ते ग्लेन मॅक्सवेलपर्यंत; दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंची यादी

IPL 2025: सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ च्या हंगामात अनेक प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, ज्यामुळे फ्रँचायझींना त्यांच्या रणनीतींमध्ये बदल करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 20:39 IST2025-05-04T20:39:35+5:302025-05-04T20:39:57+5:30

whatsapp join usJoin us
From Rituraj Gaikwad to Glenn Maxwell; List of players who have been ruled out of IPL due to injuries | ऋतुराज गायकवाड ते ग्लेन मॅक्सवेलपर्यंत; दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंची यादी

ऋतुराज गायकवाड ते ग्लेन मॅक्सवेलपर्यंत; दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंची यादी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ च्या हंगामात अनेक प्रमुख खेळाडू दुखापत झाली, ज्यामुळे फ्रँचायझींना त्यांच्या रणनीतींमध्ये बदल करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि इतर संघांसह विविध संघांमधील अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, ज्या मोठ्या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे.

१) ग्लेन मॅक्सवेल (पंचाब किंग्ज)
मॅक्सवेलला बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे संघाबाहेर जावे लागले. तो ३० एप्रिल रोजी सीएसके विरुद्ध पीबीकेएसच्या सामन्यात खेळू शकला नाही. पंजाबने १ मे रोजी त्याच्या दुखापतीची माहिती दिली. त्याने सहा डावांमध्ये फक्त ४८ धावा केल्या आणि चार विकेट घेतल्या.

२) संदीप शर्मा (राजस्थान रॉयल्स)
२८ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध स्वतःच्याच गोलंदाजीवर चेंडू पकडताना संदीप शर्माच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. १ मे रोजी आरआरने त्याची माघार निश्चित केली. त्याने १० सामने खेळले आणि नऊ विकेट्स घेतल्या.

३) ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज)
३० मार्च रोजी आरआर विरुद्धच्या सामन्यात सीएसकेच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या कोपराची दुखापत झाली. पाच सामन्यांत त्याला १२२ धावा करता आल्या. त्याच्या जागी आयुष म्हात्रेला संघात स्थान देण्यात आले. त्याच्या अनुपस्थितीत एमएस धोनी सीएसकेचे नेतृत्व करत आहे.

४) अॅडम झम्पा (सनरायजर्स हैदराबाद)
दोन सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पाच्या खांद्याला दुखापत झाली. या हंगामात त्याने दोन विकेट घेतल्या. त्याच्या जागी कर्नाटकचा फलंदाज रविचंद्रन स्मरनला संघात स्थान देण्यात आले.

५) विघ्नेश पुथूर (मुंबई इंडियन्स)
अनकॅप फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. परंतु, दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. एमआयने त्याच्या जागी लेग स्पिनर रघु शर्माला ३० लाख रुपयांना करारबद्ध केले.

६) गुरजपनीत सिंग (चेन्नई सुपरकिंग्ज)
डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग एकही सामना न खेळता बाहेर पडला. त्याच्या जागी फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात स्थान देण्यात आले. सीएसकेने १८ एप्रिल रोजी ही घोषणा केली.

७) लॉकी फॉर्ग्युसन (पंजाब किंग्ज)
१२ एप्रिल रोजी एसआरएच विरुद्ध फक्त दोन चेंडू टाकल्यानंतर लॉकी फर्ग्युसन जखमी होऊन मैदानाबाहेर गेला. त्याने चार सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. पीबीकेएसने ही गंभीर दुखापत असल्याची पुष्टी केली.

८) ग्लेन फिलिप्स (गुजरात टायटन्स)
६ एप्रिल रोजी एसआरएच विरुद्ध बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करताना फिलिप्सच्या मांडीला दुखापत झाली. तो एकही सामना खेळला नाही आणि त्याच्या जागी श्रीलंकेच्या दासुन शनाकाला संधी देण्यात आली.

Web Title: From Rituraj Gaikwad to Glenn Maxwell; List of players who have been ruled out of IPL due to injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.