Join us  

मित्रावर बलात्काराचा आरोप झाला; पण ' या ' खेळाडूचे झाले निलंबन

श्रीलंकेच्या संघातील एका खेळाडूवर त्यांच्या मंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. ही कारवाई मैदानातील चुकीमुळे नसून मैदानाबाहेर उधळलेल्या गुणांमुळे झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:14 PM

Open in App
ठळक मुद्देहे वाईट कृत्य होत असताना तो त्याच रुममध्ये होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली नसली तरी मंडळाने बडगा उगारला आहे.

नवी दिल्ली : तुमची काही चूक नसेल तरी तुमच्या जवळच्या लोकांमुळे तुम्ही अचडणीत येऊ शकता. या गोष्टी बऱ्याचदा आपण पाहिल्या आहेत. पण एका खेळाडूला त्याच्या मित्राने केलेल्या वाईट कृत्यामुळे संघातील स्थान गमवावे लागले आहे.

ही घटना घडली आहे ती श्रीलंकेतील कोलंबोमध्ये. सध्याच्या घडीला श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी संपली आहे. श्रीलंकेने ही कसोटी 199 धावांनी जिंकली. श्रीलंकेच्या संघातील एका खेळाडूवर त्यांच्या मंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. ही कारवाई मैदानातील चुकीमुळे नसून मैदानाबाहेर उधळलेल्या गुणांमुळे झाली आहे.

श्रीलंकेच्या संघातील युवा खेळाडू दानुष गुणतिलका आणि त्याचा मित्र यांनी दोन नायजेरीयाच्या दोन मुलींना आपण वास्तव्यास असलेल्या रुम्समध्ये आणले. त्यांनी रुममध्ये नेमके काय केले, हे फक्त या चौघांनाच माहिती होते. पण काही वेळाने एका महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप गुणतिलकाच्या मित्रावर केला आहे. पोलिसांनी गुणतिलकाच्या मित्राला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई होणार आहे.

गुणतिलकावर यावेळी कुठलाही आरोप करण्यात आलेला नाही. पण हे वाईट कृत्य होत असताना तो त्याच रुममध्ये होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली नसली तरी मंडळाने बडगा उगारला आहे. गैरवर्तुणक केल्याप्रकरणी गुणतिलकावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील मानधनही दंड स्वरुपात कापण्यात येणार असल्याचे श्रीलंकेच्या मंडळाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :श्रीलंकाक्रिकेट