Join us  

चौथ्या स्थानी खेळेल केदार किंवा विजय

मुंबई : ‘गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटला नव्हता. विश्वचषक स्पर्धेसाठी या स्थानावर केदार जाधव किंवा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 3:39 AM

Open in App

मुंबई : ‘गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटला नव्हता. विश्वचषक स्पर्धेसाठी या स्थानावर केदार जाधव किंवा विजय शंकर यांच्यापैकी एकजण खेळू शकेल,’ असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, ‘गेल्या एका महिन्यात आम्हाला संघ निवड करताना अनेक अडचणी आल्या. मात्र चांगल्या यष्टीरक्षणाच्या जोरावर कार्तिकला संघात स्थान मिळाले आहे. लोकेश राहुल अतिरिक्त सलामीवीर म्हणून संघात असेल आणि संघ व्यवस्थापन आपल्या गरजेनुसार त्याला खेळवतील.’ अष्टपैलू खेळाडूविषयी प्रसाद यांनी म्हटले की, ‘सामन्यामध्ये अनेकद असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला अष्टपैलू खेळाडूची खूप गरज भासते. यासाठीच रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली आहे. तो संघाला फायदा मिळवून देऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही अंबाती रायुडूला खूप संधी दिल्या, मात्र विजय शंकर चांगली गोलंदाजीही करु शकतो. याशिवाय तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे.’ सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन निवड समितीचे लक्ष वेधण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. मात्र विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडताना आयपीएलमधील कामगिरीचा कोणताही आधार घेण्यात आलेला नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.याविषयी त्यांनी सांगितले की, ‘संघ निवड करताना आयपीएलच्या कामगिरीचा परिणाम झालेला नाही. शुभमान गिल, मयांक अग्रवाल यांसारखे युवा खेळाडू आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत आहेत. मात्र निवडीसाठी आयपीएल आधार नाही. रिषभ पंतमध्ये मोठी गुणवत्ता आहे, पण दुर्दैवाने तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही.अनेकदा दिनेश कार्तिकने भारतासाठी ‘फिनिशर’ची भूमिका बजावली आहे.’ दरम्यान यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीवर नजर टाकल्यास आतापर्यंत रिषभ पंतने २४५ धावा केल्या असून दिनेश कार्तिकने १११ धावा केल्या आहेत. त्यामुळेच ही संघ निवड आयपीएलच्या कामगिरीनुसार झालेली नसल्याचे सिद्ध होते.>पर्यायी यष्टीरक्षकासाठी आम्ही विस्तृत चर्चा केली. दोघांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये तेव्हाच संधी मिळेल, जेव्हा महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त असेल. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाचा सामन्यात यष्टीरक्षण खूप महत्त्वाचे ठरते. याच कारणामुळे आम्ही पंतऐवजी कार्तिकची निवड केली. तसेच संघात चौथ्या स्थानासाठी याआधी आम्हाला अंबाती रायुडूचे स्थान पक्के दिसत होते. मात्र आॅस्टेÑलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती.- एमएसकेप्रसाद----शंकर ठरू शकतो हुकमी एक्काविश्वचषकसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात विजय शंकरचे नाव सर्वांना बुचकळ्यात टाकणारे आहे. ९ एकदिवसीय आणि ९ टी२० सामने एवढाच काय तो शंकरचा आंतरराष्ट्रीय अनुभव, पण तरीही त्याने मौके पे चौका मारताना विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान पटकावले. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी शंकरच्या निवडीबाबत सांगितले की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही मधल्या फळीसाठी अनेक पर्याय वापरून पाहिले. त्यात दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांचा समावेश होता. आम्ही अंबाती रायुडूलाही अनेक संधी दिल्या, परंतु विजय शंकरचा आम्ही अष्टपैलू म्हणून वापर करू शकतो. तो फलंदाजी व गोलंदाजीही करू शकतो, तसेच तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. चौथ्या स्थानासाठी शंकरचा आम्ही विचार करत आहोत.’>यंदा खेळणार७ नवे चेहरे२०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघातील ७ खेळाडू सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा खेळतील. त्याचवेळी, तब्बल ७ खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत आपली छाप पाडण्यास सज्ज होतील. त्याचप्रमाणे दिनेश कार्तिक २००७ सालानंतर पहिल्यांदा विश्वचषक खेळेल.>केदार जाधवमहाराष्ट्राच्या या खेळाडूने गेल्या वर्षभरात खूप प्रभावित केले. मॅच फिनिशिंग व उपयुक्त गोलंदाजी हे त्याचे बलस्थान आहे. फिटनेस व मोठ्या स्पर्धेतील अनुभवाची कमतरता त्याची कमकुवत बाजू आहे. केदारने ५९ सामन्यांत ४३.४८ च्या सरासरीने ११७४ धावा केल्या असून यात २ शतके व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १२० त्याची सर्वाेच्च खेळी.>हार्दिक पांड्याएक आक्रमक फलंदाज, जबरदस्त क्षेत्ररक्षक, गोलंदाज व मॅच फिनिशर ही त्याची बलस्थाने आहेत. शॉर्टपिच गोलंदाजीपुढे मात्र तो चाचपडतो. सातत्याची कमतरता ही त्याची कमकुवत बाजू. त्याने ४५ एकदिवसीय सामन्यांत ७३१ धावा केल्या. त्यात ८३ धावा सर्वाेच्च आहेत. ४४ बळी सुद्धा त्याच्या नावावर आहेत.>कुलदीप यादव२३ वर्षीय कुलदीप भुवनेश्वर , इम्रान ताहीर व अजंथा मेंडिसनंतर तिन्ही प्रकारांत ५ बळी मिळवणारा गोलंदाज ठरला. क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करण्यात माहिर. धावा रोखण्यात अपयशी ठरतो. आत्मविश्वासाची कमतरता त्याची कमकुवत बाजू. कुलदीपने ४४ एकदिवसीय सामन्यांत २१.७४ च्या सरासरीने ८७ बळी घेतले.>युझवेंद्र चहलसुरूवातीला बुद्धिबळपटू असलेला चहल आज भारताचा आघाडीचा लेगस्पिनर आहे. मनगटाने चेंडू वळवणे व सातत्य हे त्याचे बलस्थान आहे. चहलने ४१ एकदिवसीय सामन्यात २४.६१ च्या सरासरीने ७२ बळी घेतले आहेत. जास्त धावा गेल्या तरी दडपण न घेता बळी मिळवण्याचाच त्याचा प्रयत्न असतो.>बुमराहबुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. आयसीसी क्रमवारीत तो अव्वल आहे. १४०-१४५ किमी वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता. गोलंदाजीत मिश्रण. डेथ ओव्हर्समध्ये अधिक भेदक. मोक्याच्या क्षणी नो बॉल फेकण्याची भीती त्याची कमकुवत बाजू ठरु शकते. बुमराहने ४९ एकदिवसीय सामन्यांत २२.१५ च्या सरासरीने ८५ बळी घेतले.>रिषभ पंत : संघातून वगळलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती रिषभ पंतची. कसोटी क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवलेला पंत मर्यादित षटकांमध्ये मात्र अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.>... आणिकार्तिकलासंधी मिळालीविश्वचषक स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनीसाठी पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात कुणाची निवड होईल, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. अनेकांच्या मनात प्रश्नही निर्माण झाले होते. अखेर अनुभवी दिनेश कार्तिकच्या नावाची घोषणा झाली. दिनेश कार्तिकची निवड का झाली, हेसुद्धा निवडकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘रिषभ पंत निवडला गेला असता. मात्र, दिनेशचा अनुभव त्याच्यापेक्षा वरचढ राहिला,’ असे स्पष्ट मत निवड समितीने व्यक्त केले. यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि युवा खेळाडू रिषभ पंत यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती.

लोकेश राहुलउत्तम गुणवत्ता असलेल्या फलंदाज राहूलने १४ एकदिवसीय सामन्यात ८०.९ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या. त्यात एक शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. फिटनेस त्याची जमेची बाजू आहे. तो सलामीसह मधल्या फळीतही खेळू शकतो. वादात राहणारा खेळाडू व त्यामुळे फॉर्म हरपण्याची भिती. मोठ्या स्पर्धेतील अनुभव नसणे त्याची कमकुवत बाजू आहे.>विजय शंकरअष्टपैलु हार्दिकला पर्याय म्हणून शंकरकडे पाहिले जाते. त्याने ९ एकदिवसीय सामन्यात १६५ धावा केल्या असून केवळ २ बळी मिळवले आहेत. फारसा अनुभव नसणे हीच त्याची कमकुवत बाजू आहे. तरीही न्यूझीलंडविरुद्ध त्याने आपण दबावातही खेळू शकतो हे सिद्ध केले. तो फलंदाजीत उजवा वाटतो. मधल्या फळीत तो चांगला फलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करुन मोक्याच्या वेळी फटकेबाजी त्याची जमेची बाजू आहे.

टॅग्स :केदार जाधववर्ल्ड कप २०१९बीसीसीआय