माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे निधन

भारताचे माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे डेहराडून येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:22 IST2018-05-11T00:22:09+5:302018-05-11T00:22:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Former Test player Rajinder Pal passes Away | माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे निधन

माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे निधन

नवी दिल्ली - भारताचे माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे डेहराडून येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू व राजिंदर यांचे भाऊ रविंदर पाल म्हणाले की, ‘माझे मोठे भाऊ राजिंदर यांचे बुधवारी डेहराडून येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे.’
वेगवान गोलंदाज असलेले पाल यांनी आपला एकमेव कसोटी सामना १९६३-६४ च्या मोसमात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९८ सामन्यात ३३७ गडी बाद केले असून २३ वेळा पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद केले आहेत.

Web Title: Former Test player Rajinder Pal passes Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.