Join us  

स्पॉट फिक्सिंग प्रकरण : दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला पाच वर्षांचा कारावास 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र पाहुण्यांनी गाजवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:54 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र पाहुण्यांनी गाजवलं. कागिसो रबाडा आणि अॅऩरिच नोर्ट्जे यांनी उपाहारापर्यंत भारताचे तीन फलंदाज अवघ्या 71 धावांत माघारी पाठवले. आफ्रिकन संघासाठी मैदानावरील कामगिरी समाधानकारक झाली असली तरी मैदानाबाहेर त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा माजी खेळाडू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला आहे आणि त्याच्यावर पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  गुलाम बोदी असे या खेळाडूचे नाव आहे. 2015च्या स्थानिक क्रिकेटमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणात बोदी दोषी आढळला.

2004च्या Prevention and Combatting of Corrupt Activities Act नुसार शिक्षा होणारा बोदी हा पहिलाच आफ्रिकन खेळाडू आहे. 2000 साली हँसी क्रोन्ये मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर हा कायदा करण्यात आला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भ्रष्टाचाराच्या आरोपात तो दोषी आढळला होता. त्यानं कोर्टाकडे दयेची विनंती केली होती. बोदीनं आफ्रिकेकडून दोन वनडे आणि एक ट्वेंटी-20 सामना खेळला आहे.

तो म्हणाला, ''माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चुक आहे. क्रिकेटवर माझे प्रेम आहे. 18 वर्ष मी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होतो.'' कठीण प्रसंगी बोदीनं बटाटे विकून उदरनिर्वाह केला आहे. 

टॅग्स :द. आफ्रिकामॅच फिक्सिंग