Join us  

शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे!

आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यात त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 2:03 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलं आहे. दोन दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात जाऊन मदत करताना आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून त्याच्यावर जोरदार टीका झाली. तरीही आफ्रिदीनं वाचाळ वक्तव्यांची मालिका कायम राखली आहे. 

आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यात त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्याच्या या विधानाचा भारताचे क्रिकेटपटू गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी चांगलाच समाचार घेतला. भज्जी आणि युवी यांनी काही दिवसांपूर्वी आफ्रिदीच्या समाजकार्याला मदत करण्याचं आवाहन केलं होत, पण आता त्यांनी आपली चूक झाल्याचे मान्य केले. 

आता आफ्रिदीचे आणखी एक धक्कादायक विधान समोर येत आहे. क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात पाकिस्तान सुपर लीगमध्ये काश्मीर संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तो म्हणाला," पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मी विनंती करू इच्छितो की पुढच्या वेळेस पाकिस्तान सुपर लीगमध्ये काश्मीर संघाचा समावेश करा. पाकिस्तान सुपर लीगमधील माझ्या अखेरच्या वर्षात मला त्या संघाचे नेतृत्व करायचे आहे."तो पुढे म्हणाला,"काश्मीरमध्ये स्टेडियम असेल तर तिथे क्रिकेट अकादमी असायला हवी आणि मी कराचीहून येथी प्रशिक्षण देण्यासाठी येण्यास तयार आहे. या विभागात १२५ क्लब आहेत असं मी एकलं आहे. त्यातून संघाला चांगले खेळाडू मिळू शकतील."

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानजम्मू-काश्मीर