Join us  

17 वर्षीय नसीम शाह टीम इंडियाच्या विराट कोहलीला सहज बाद करेल; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा

पाकिस्तानी क्रिकेटपटूचं धाडसी विधान...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 10:43 AM

Open in App

विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, यात कोणताही वाद नाही. पण, पाकिस्तानी खेळाडू टीम इंडियाच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी आतुर आहेत. त्यामुळेच भविष्यात 17 वर्षीय नसीम शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला सहज बाद करेल, असा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू फैसल इक्बाल यानं केला आहे. नसीमच्या गोलंदाजीवर विराट चाचपडेल, असाही दावा इक्बालनं केला.

इक्बाल म्हणाला,''विराट कोहलीचा मी आदर करतो. तो सर्वोत्तम फलंदाज आहे. पण, नसीम शाह हा उद्याचा सुपरस्टार आहे. त्याचा जलद व स्विंग मारा भल्याभल्या फलंदाजांना हतबल करेल. तो विराट कोहलीलाही सहज बाद करू शकतो. त्यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी उत्सुक आहे.'' 

नसीमने काही दिवसांपूर्वी विराटला गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक असल्याचे विधान केलं होतं.  विराटची अन्य गोलंदाजांवर दहशत असली तरी नसीम मात्र विराटला घाबरत नसल्याचे म्हणाला होता. विराटचा आदर आहे, परंतु त्याला घाबरत नसल्याचे मत त्यानं व्यक्त केलं होतं.

तो म्हणाला होता,''भारताविरुद्ध मी चांगली गोलंदाजी करेन, अशी मला आशा आहे. पण, त्या संधीची वाट पाहतोय आणि मी चाहत्यांना निराश नक्की करणार नाही. मी विराटचा आदर करतो, परंतु त्याला घाबरत नाही. सर्वोत्तम फलंदाजाला गोलंदाजी करणं, हे नेहमी आव्हानात्मक असते, परंतु तेथेच तुम्हाला तुमची कामगिरी उंचावण्याची संधी असते. त्यामुळे मला विराटविरुद्ध खेळायचे आहे.''

''भारतविरुद्ध पाकिस्तान हा सामना स्पेशल आहे आणि या सामन्यातून एक तर खेळाडू नायक बनतात किंवा खलनायक. भारत-पाक सामना क्वचितच होतो. त्यामुळे ही संधी मला कधी मिळेल, याची वाट पाहत आहे,''असे तो म्हणाला. नसीमनं 16व्या वर्षी पाकिस्तानच्या कसोटी संघातून पदार्पण केलं. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या  मालिकेत त्यानं 5 विकेट्स घेतल्या आणि बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेत इतिहास घडवला. कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो युवा गोलंदाज ठरला.  

निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती

 

टॅग्स :विराट कोहलीपाकिस्तान